ग्राहक एक अशी व्यक्ती किंवा व्यक्तीचा गट आहे ज्याचा वस्तूची खरेदी-विक्री करण्याच्या कामकाजाशी संबंध नसून ;वस्तू किंवा सेवा प्रामुख्याने वैयक्तिक, सामाजिक, कुटुंब, घरगुती आणि तत्सम गरजा भागविण्यासाठी, किंवा वापरण्याच्या कामकाजाशी संबंध आहे.
वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा बनवला गेला. दरवर्षी १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. तर भारतात दरवर्षी २४ डिसेंबरला ‘National Consumer Day’ अर्थात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो.
जागतिक ग्राहक दिन
अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये १५ मार्च , १९६२ मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकारांबद्दल भाषण केले होते.ग्राहक हक्कांबद्दल भाष्य करणारे ते पहिले नेते ठरले होते. ग्राहक हक्कांची चळवळ चालवणाऱ्या नागरिकांनी १९८३ मध्ये पहिल्यांदा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक ग्राहक दिन हा आतंरराष्ट्रीय पातळीवर १५ मार्चला साजरा केला जातो.
राष्ट्रीय ग्राहक दिन
भारतात १९८६ मध्ये २४ डिसेंबरला ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तर, सन १९९१ आणि १९९३ मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्याचा जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर २००२ मध्ये पुन्हा या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. नंतर १५ मार्च २००३ पासून या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तथापि, या कायद्यातसुद्धा १९८७ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. परंतु, ५ मार्च २००४ रोजी याची संपूर्ण अधिसूचना देण्यात आली.
हे आहेत ग्राहकांचे मुख्य अधिकार
सुरक्षिततेचा अधिकार
माहितीचा अधिकार
निवड करण्याचा अधिकार
समस्या निराकरण करण्याचा अधिकार
ग्राहक शिक्षणाचा अधिकार
हे अधिकार असणाऱ्या सर्व ग्राहकांना, जागतिक ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।
ग्राहक राजा, सुखी भव ।
Comentários