top of page

एका नवीन ध्येयाकडे ....

Writer's picture: AimSolute SolutionistAimSolute Solutionist

शीर्षक वाचून प्रश्न पडले का ?


की चित्र पाहून अजून बुचकळ्यात पडलात ?


हो

हो

तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देणारच आहे.


त्यापूर्वी तुम्हा सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार .

हा लेख खास तुम्हा वाचकांसाठी ...


ज्यांच्यामुळे ही वेबसाईट चालू झाली ..


ज्यांच्या सततच्या प्रोत्साहनातून अनेक नवनवीन विषय येथे मांडता आले.


उद्योजक म्हणून प्रस्थापित होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला आपली वाटणारी आपल्या या साईटने नुकतेच एका नवीन ध्येयाकडे जाण्याची सुरुवात केली आहे...

नवीन ध्येय ?


अरे हो...

सांगते...

येथे प्रसिद्ध होणारे लेख तुम्ही वाचता ना ? असे किती लेख इथे प्रसिद्ध झाले आहेत, माहित आहे का ?

या बद्दल काही कल्पना आहे का?



३ सप्टेंबर २०२३ या दिवशी आपण १००० वा लेख प्रसिद्ध केला आणि आजच्या कृष्णाष्टमी च्या दिवशी ही बातमी तुम्हा सर्वांना सांगताना खूप आनंद होत आहे. सर्व मराठी आणि इंग्लिश या दोन भाषेमध्ये आजपर्यंत १००० पेक्षा जास्त लेख येथे प्रसिद्ध झाले आहेत.


तुम्हा सर्वांचे अभ्हार कसे मानायचे ? हा प्रश्न आहेच ... पण त्यापेक्षा तुमचे प्रेम हे असेच राहू द्या.तुमचे हे ऋण कायम आमच्यावर असावेत, असेच वाटते.


केवळ तुमच्यामुळेच आम्ही पन्नास वेगवेगळ्या देशात पोहचू शकलो. उद्योजकाला डोळ्यासमोर ठेवून तयार झालेली ही साईट , आता प्रत्येकाला आपली वाटू लागली आहे... कारण यावर हाताळले गेलेले विषय हे वाचकांच्या हृदयाच्या अगदी जवळचे आहेत. इथे उहापोह होणारे विषय हे प्रत्येकाला आपले वाटतात\. त्यामुळेच हा एक हजार लेखांचा टप्पा आम्हाला गाठता आला.


तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत ..

तुम्हाला आवडणारे लेख कोणते ?

कोणते लेख तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील दाखवले आहेत ?

कोणते विषय इथे आणावेत असे तुम्हाला वाटते ?


तुम्हाला भेटायची इच्छा खूप आहे. तुम्ही आमच्यासाठी प्राणवायूचे काम करता...

Comments


©2024 by AimSolute.

  • Facebook
  • LinkedIn
  • YouTube
bottom of page