top of page
Writer's pictureAimSolute Solutionist

नेपाळच्या माजी उपपंतप्रधानांकडून, डॉ. मुणगेकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

दक्षिण आशियाई देशांची विभागीय (प्रादेशिक) सहकार्यासाठी स्थापन झालेली एक संघटना. तिचे पूर्ण इंग्रजी नाव ‘एशियन असोसिएशन फॉर रीजनल को-ऑपरेशन’ असे असून त्यास मराठी पर्यायी नाव ‘आशियाई विभागीय सहकार्य संघटना’ असे आहे. तिची स्थापना १९८५ मध्ये झाली व तिचे स्थायी कार्यालय (सचिवालय) काठमांडू (नेपाळ) येथे आहे.


नेपाळमध्ये सार्क नेपाळची राजधानी काठमांडू येथे दिनांक १६ एप्रिल, २०२२ रोजी सार्कची (SARC) आंतरराष्ट्रीय परिषद नेपाळ पर्यटन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व डॉ. प्रतिक राजन मुणगेकर यांनी केले.


या आंतरराष्ट्रीय परिषदेत ( दक्षिण आशियाई प्रादेशिक देश) भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, अफगाणिस्तान हे देश सहभागी झाले होते. एकूण १०० प्रतिनिधी उपस्थित होते. सार्क परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व प्रा. डॉ. प्रतिक राजन मुणगेकर यांनी केले. त्याचप्रमाणे संस्कृती शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात सार्कमध्ये असलेल्या देशांच्या नृत्यकलेचे सादरीकरण पहावयास मिळाले.


केंद्रीय कार्यसमितीच्या, नेपाळच्या माजी उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एच. ई. सुजाता कोईराला आणि सांस्कृतिक पर्यटन व विमान वाहतूक मंत्री एच. ई. प्रेम बहादूर यांच्या हस्ते शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल दक्षिण आशियाई प्रादेशिक देश ब्रिलायन्स अवॉर्ड २०२२ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने प्रा. डॉ. प्रतिक राजन मुणगेकर यांना सन्मानित करण्यात आले. भारताच्या आयुष मंत्रालयाचे माजी सदस्य डॉ दिनेश उपाध्याय, डॉ राजीब पाल, श्री चंद्रकुमार बोस (नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नातू) अनेक मान्यवर या परिषदेला उपस्थित होते. ६५०० नामांकनांमधून विविध क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या ठराविक व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला.


प्रा. डॉ. प्रतिक राजन मुणगेकर यांना शिक्षण व संशोधन या क्षेत्रातील योगदानासाठी ७०० हून अधिक आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जगभरातून २५० हून अधिक डॉक्टरेट्स (मानद उपाधी ) बहाल करण्यात आल्या आहेत. तसेच अवघ्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी शिक्षण, अध्यापन व संशोधन या क्षेत्रांमध्ये पंधरा विश्वविक्रम करणारे एकमेव भारतीय आहेत.


आजच्या घडीला प्रा. डॉ. प्रतिक राजन मुणगेकर हे प्रतिष्ठित शास्त्रज्ञ, प्राध्यापक, जागतिक शिक्षणतज्ज्ञ, प्रकाशित लेखक, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता व आंतरराष्ट्रीय वक्ता आहेत.

Comments


bottom of page