आपल्या व्यवसायाची जाहिरात करायची आहे हे पकके केले ना ?

आता हे पण ठरवून घेऊया :
आपल्या सेवेबद्दल / वस्तूबद्दल ' काय काय ' जाहीर करायचे आहे, हे आधी लिहून काढा.
जहिरातींमध्ये तुम्ही ग्राहकांना काय देऊ शकता , हे अधोरेखित होणे , अत्यंत गरजेचे आहे. तुमचा संपर्क क्रमांक किंवा तुमच्यापर्यंत अथवा तुमच्या वस्तू / सेवेपर्यंत ग्राहकाला कसे पोहोचता येईल , हे सांगणे देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर, फक्त आपल्या व्यवसायाचे नाव अधोरेखित न करता, काय देऊ शकता ? यावर भर दिला पाहिजे.
भावनिक आवाहन केलं तर चालेल , पण, गुणवत्ता, स्पष्टता आणि पारदर्शकता तडजोड अजिबात नको.
जाहिरातीच्या या युगात जाहिरात करण्यासाठी खूप माध्यमे , अत्यंत सहजगत्या , उपलब्ध आहेत. कोणते माध्यम वापरायचे? कोणते माध्यम वापरायला हवे? समाज माध्यमांचा वापर करायचा का?

जाहिरात करताना कोणते माध्यम वापरणे , आर्थिकदृष्ट्या जास्त योग्य आहे? कोणत्या माध्यमावर ग्राहकांचा जास्त विश्वास आहे ? दूरदर्शन, आकशवाणी या माध्यमाचा आवाका खूप मोठा आहे. त्याचा वापर करणे योग्य असेल का? असा अनेकविध प्रश्नांचा अभ्यास व्हावयास हवा.
ग्राहकाची भाषा हि जाहिरातीची भाषा. बोली भाषा वापरली , तर उत्तम. मग, उद्योजकाची मातृभाषा किंवा त्यांना येत असलेली भाषा कोणतीही असली तरी चालेल. महत्तवाचे हे आहे की, तुम्ही किती योग्य प्रकारे पटवून देऊ शकता ? आणि तेही साध्या, सोप्या आणि कमीत कमी शब्दात.
आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना प्रत्यक्ष आपल्या व्यवसायाबद्दल सांगणे , ही खरी तर जाहिरात करण्याची योग्य सुरुवात होऊ शकते. वेळोवेळी, गरजेनुसार , त्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत. तुमच्याबद्दल , तुमच्या सेवेबद्दल, कोणी प्रत्यक्ष , तोंडी स्वरूपात आणि उस्फुर्त पणे , इतरांना , माहित देत असेल , तर यासारखी ' प्रसिद्धी' दुसरी कोणतीही नाही.
सगळ्याच जाहिराती या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी करू नका. एखादी जाहिरात ही ग्राहकांचे आभार मानण्यासाठी करा. तुम्ही नवीन कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केलंत, ते सांगण्यासाठी योग्य माध्यमातून तुमच्या ग्राहकांपर्यंत, पुरवठादारांपर्यंत पोहोचवा. सण, स्थापना दिवस , इ. गोष्टींकडे एका वेगळ्या नजरेतून पाहा.
जाहिरात करण्यास तयार झालात ना ? अजून काही शंका असल्यास , नक्की विचारा : +९१ ९१६८५५३९७२ .
Comments