top of page

उद्योग सुरु होण्याचे टप्पे

Writer's picture: Ms. Harshadaa PotadarMs. Harshadaa Potadar

Updated: Jun 15, 2021

उद्योग करणे, हे वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही. एकदा उद्योग करण्याचे पक्के झाल्यावर अनेक बाबी नव्याने समोर येतात. कितीतरी नवीन , पण ,आवश्यक गोष्टी माहित करून घेणे , गरजेचे होते.


आपले कुटुंबीय, मित्र, नातेवाईक आणि शुभ चिंतक, आपल्या काळजीपोटी अनेक सूचना, 'आदेश' वजा सल्ले , संबंधित 'उपयुक्त (!)' माहिती सतत आपल्याला देत असतात. कित्येकदा माहितीचा भडीमारही होतो.


अशा नुकतेच उद्योजकतेच्या वाटेवर पाऊल टाकणारे , ' उद्याचे ' उद्योजक, आज मात्र संभ्रमात जातात. विशेषतः पहिल्यांदा व्यवसाय करणायचा विचार करणारे , पहिल्या पिढीतील , नव उद्योजक नैराश्याला सुद्धा बळी पडतात.


ध्येय समोर दिसत असते, पण त्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग दिसत नसतो.



कोणता रस्ता बरोबर आहे ? कोणाचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरेल ? मी एकटा / एकटी हे सगळे निभावू शकेल ना? हे आणि इतर अशा अनेक प्रश्नांच्या चक्रव्यूहामध्ये अडकत जातात.


यातून बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग आहे. जितके तुम्हाला लिहून काढता येईल, ते सर्व लिहुन काढा. जसे जमेल तसे. हे लिहीत असताना, तुम्हाला काय करणे गरजेचे आहे , याचा अंदाज यायला लागेल.


साधारणपणे , कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये खालील दिलेल्या गोष्टींचा समावेश होतो. एखदी दुसरी प्रक्रिया मागे पुढे होऊ शकते. उद्योगाच्या स्वरूपानुसार , काही विशिष्ट प्रक्रिया समाविष्ट होऊ शकतात.



उद्योग सुरु होण्याचे टप्पे :

  • १. उद्योग व्यापार करण्याचा विचार

  • २. उपलब्ध माहितीचे संकलन आणि वर्गीकरण

  • ३. " योग्य " उद्योग संधीची निवड

  • ४. वित्त पुरवठा तयारी

  • ५. अनेक उपलब्ब्ध पर्यायांतून उद्योग व्यवसाय निवड

  • ६. कागदपत्रे गोळा करणे

  • ७. प्रकल्प अहवाल तयार करणे.

  • ८. स्थापना नोंदणी

  • ९. भांडवल उभारणीची प्रक्रिया सुरु करणे

  • १०. जागेचा शोध

  • ११. परवानग्या , लागणारे परवाने मिळविणे

  • १२. जागा इमारत आणि बांधकाम , इ .

  • १३. यंत्रसामुग्री निवड

  • १४. मनुष्यबळाची निवड

  • १५. कच्च्या मालाची खरेदी

  • १६. विक्री व्यवस्थेची निर्मिती

  • १७. प्रायोगिक तत्वावर , उत्पादन सुरु करणे

  • १८. व्यापारी तत्त्वावर , उत्पादन सुरु करणे





हे १८ टप्पे तुम्हाला तुमचे नियोजन सुलभ आणि सुकर करण्यास नक्कीच मदत करतील. संभ्रम दूर होऊन दिशा देण्यास उपयुक्त ठरतील. अशक्य असे काहीच नाही. फक्त, नियोजन मात्र पक्के हवे मग , ध्येय तुमचेच ...



.



Comments


bottom of page