उद्योजक हा उद्योगाचा खऱ्या अर्थाने ' सारथी ' असतो. मग तो उद्योग / व्यवसाय कितीही छोटा नवीन असो अथवा जुना. त्या उद्योगाची चाके, उद्योजकाच्या विचाराप्रमाणेच फिरत असतात. संयम, कष्ट करण्याची तयारी, धाडस आणि सकारात्मकतेच्या , तो उद्योजक किंवा ती उद्योजिका, उद्योजकतेच्या वाटेवर, घट्ट पाय रोवण्याचा प्रयत्न करत असते. पण, या सगळ्यांबरोबर, हा उद्योग रथ सतत चालू राहण्यासाठी जे इंधन लागते, ते म्हणजे कुटुंबीयांचा सकारात्मक पाठिंबा.
माणूस या हा समाजशील प्राणी आहे. उद्योजकीय मानसिकता घडविण्यात सगळ्यात मुख्य भूमिका ही समाजाची आणि कुटुंबाची आहे. उद्योग / व्यवसाय उभारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची खरी गरज आहे.
मानसिक पाठबळ
उद्योग म्हणजे जोखीम. रोजच्या रोज उद्भवणारे प्रश्न, व्ययसायातील चढ - उतार, इ. अनेक गोष्टीना उद्योजकाला सामोरे जावे लागते. या सर्व प्रसंगांमध्ये उभे राहण्याचे प्राथमिक धडे हे घराच्या अंगणातच शिकायला हवेत. व्ययस्थापन शास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात इतके सहज उत्तरे मिळणार नाहीत, जी कुटुंबातील सदस्यांच्या मनमोकळ्या संवादातून मिळू शकतील. कुटुंबीय आणि मित्र फक्त तुमच्यामागे उभे राहत नाहीत , तर 'दीपस्तंभा'सारखे मार्गदर्शन देखील करतात. कुटुंबाचे योगदान आहे, म्हणून आज कित्येक सूक्ष्म आणि लघु उद्योग उभे राहू शकले.
कुटुंबीयांचा विश्वास जिंकणे हे हि तेवढेच महत्त्वाचे . तुमची वागणूक हि तेवढीच पारदर्शक असायला हवी. कुटुंबाचा विश्वास जिंकण्यात जर नव उद्योजक यशस्वी झाले टार्ट तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही.
आर्थिक मदत
प्रत्येक कुटुंबाची आर्थिक क्षमता हि निरनिराळी असते. उद्योग सुरु करण्यासाठी प्राथमिक भांडवल बऱ्याच वेळा घरातूनच उभारले जाते. असे नाही केले तर जास्त चांगले. अनेक बँका आणि वित्तीय संस्था भांडवल उभारणी साठी सहायय करू शकतात. आणि घरातून जर घेतले असेल तर ते विनाशर्त घेऊ नका. आर्थिक नियोजन असे करा कि कि घेतलेली रक्कम तुम्ही लवकरात लवकर परत द्याल . आर्थिक शिस्तीला पर्यय नाही .
उद्योजकांशी संवाद साधा
सारेच उद्योजक आपल्या समस्यांवर , कुटुंबीय अथवा मित्रांबरोबर , चर्चा करणे , पसंत करत नाही. पण, त्यांना बोलते करा. आर्थिक मदतीपेक्षा रोज पाच मिनिटांचा संवाद खूप सकारात्मक ऊर्जा देतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नैराश्य किंवा इतर मानसिक आजारांना दूर ठेवतो.
रोज पाच मिनिटे , न चुकता , कोणत्याही विषयावर संवाद साधा.
समाजाचा उस्फुर्त सहभाग
उद्योग उभारणे हि समाजाची एकत्रित जबाबदारी आहे. भविष्याच्या दृष्टीने नवीन उद्योगांना प्रोत्साहन देत , असलेले उद्योग व्यवसाय टिकवण्यावर भर दिला पाहिजे. तरच आजच्या परिसिथिमध्ये अति सुक्ष्म , सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग तग धरू शकतील. नव उद्योजकांना फक्त तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चांगल्या मार्गावर आणण्याचे कार्य , हे उद्योजकच करणार आहेत.
आपल्या भारताची व्यवस्था हि नवीन उद्योग उभारण्यासाठी पोषक आहे. (3rd largest startup ecosystem, in the world.)
मग,
चला आपणही एक पाऊल पुढे टाकूया ... हा जागतिक कुटुंब दिन (१५ मे ) खऱ्या अर्थाने साजरा करूया
आपल्या जवळच्या कुटुंबियांना, मित्र मैत्रिणींना हात देउया ..
Comments