भारतात दरवर्षी जवळजवळ ५०,००० उद्योग सुरु होतात. परंतु, दीर्घकालीन अस्तित्व प्रस्थपित करणाऱ्या उद्योगांची टक्केवारी (५ %) हि अत्यंत निराशाजनक आहे. अनेक उद्योग हे पहिल्या एक - दोन वर्षातच बंद होतात. यामागील करणे अनेक आहेत . त्यातील १० प्रमुख कारणे :
१. अति घाई संकटात नेई : सारासार विचार न करता कोणत्याही उद्योगाची जोखीम उचलू नका. बरेचसे उद्योजक हे अत्यंत तुटपुंज्या माहितीच्या आधारावर लाखोंची गुंतवणूक करतात. कोणत्याही गोष्टीची घाई अजिबात करू नका. अति उत्साहापोटी केलेली एखादी गोस्ट भविष्यात तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. पूर्ण अभ्यास झाल्यानंतर च निर्णय घ्या. उद्योग सुरु करण्याची घाई अजिबात करू नका.

२. स्वप्न आणि वास्तव यातील दरी : तुमची जी संकल्पना आहे ती वास्तव जीवनात खरंच उपयोगी आहे का ? तुम्ही देत असणारी सेवेची सध्या आहे ? याचाच विचार करणे आवश्यक आहे. मी दिलेले product अथवा सेवा वापरलीच जाईल,घातक असा विश्वास घातक ठरू शकतो. उपलब्ध बाजारपेठेचा अभ्यास योग्य मार्ग शोधण्यासाठी गरजेचा आहे.
३. अपुरी विपणन व्यवस्था : ग्राहक हाच देव असतो. ग्राहक असेल तर तुमच्या सेवेला अर्थ आहे. ती वस्तू अथवा ती सेवा ग्राहकाला वेळेत पोहोचवणे, हि सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. आपल्या विपणन व्ययस्थेचे जाळे तयार होणे महत्वाचे. अपुऱ्या विपणन व्यस्थेथेमुळे, आपण आपले ग्राहक गमावू शकतो.
४. ग्राहकसेवेत सातत्याचा अभाव : ग्राहकाच्या गरजेची वस्तू त्यांना वेळेत पुरवणे गरजेचे आहे. अमेझॉन चे उदाहरण आपल्या समोर आहेच. ग्राहकसेवेतील तत्परता आणि सातत्य यामुळे ग्राहकाच्या मनातील त्यांचे स्थान अनेक वर्ष कायम आहे.
अनेक वेळा होणाऱ्या विलंबामुळे ग्राहकसंख्येवर परिणाम होतो. ग्राहक सतत नावीन्याच्या शोधात असतो. त्याच्या गरजेसानुसार , वेळेत आणि सातत्यपूर्ण सेवा देणे , दीर्घकालीन संबंधांसाठी आवश्यक आहे.
५. अपेक्षा आणि सुविधा यात अंतर : तुम्ही जी सेवा देणार आहेत , त्यांची किती गरज आहे, याचा अभ्यास बाजारपेठेत उतरण्याच्या आधी करायला हवा. बऱ्याच वेळा तुमची सेवा किंवा वस्तू, अत्यंत चांगल्या दर्जाची असून देखील स्वीकारली जात आहे.
याचे एक प्रमुख कारण म्हणजे या प्रश्नांची उत्तरे : याची खरंच, आता , गरज आहे का ?
दर योग्य आहेत ना?
ग्राहकाला त्या सेवेसंबंधी काही कल्पना देण्यात आली आहे का?
ग्राहकाचा फीडबॅक / मत हे विचारात घेऊनच पुढील नियोजन करावे.
६. आर्थिक कोंडी : अनेक उद्योग बंद पाडण्याचे किंवा ठप्प होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. अर्थ किंवा पैसे म्हणजे खरं तर उद्योगाची मुख्य ताकद . उद्योगाची नस . मागणी, सातत्य, पुरवठा, बाजारपेठेत होणारे ननवीन बदल, डिजिटल क्रांती, या एक आणि अनेक कारणांमुळे आर्थिक घडी विस्कळीत होन्यास कारणीभूत ठरू शकतात. केंद्र आणि राज्य सरकारची बदलणारी धोरणे दूरगामी परिणाम करतात. या सर्व कारणांचा एकत्रित पाने आभास करून , भविष्याचे नियोजन करावयास हवे. दार तीन अथवा सहा महिन्यांनी हे निर्णय पुन्हा पुन्हा तपासून घेणे, आणि वेळेनुसार त्यात आवश्यक ते बदल करणे, खूप फायदेशीर ठरते .

७. समन्वयाचा अभाव : पुरवठादार, कामगार, ग्राहक यांच्यात समन्वय असायलाच हवा. ग्राहकांच्या गरज, कामगारांचे कौशल्य, गुणवत्ता, इ बाबतीत जास्त लक्ष देऊन संघ शक्ती ( Team Culture ) विकसित करावी. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचे कामगार , तुमचे ग्राहक, तुम्हाला कच्चा माल पुरवणारे पुरवठादार या सर्वंवांसोबत संबंध प्रस्थापित करा. यातील कोणताही घटकाची तुमचे संबंध बिघडले तर त्याचा परिणाम व्यवसायावर होण्यास फार वेळ लागणार नाही.

८. स्वयंशिस्तीचा अभाव : उद्योग हे उद्योजकाच्या कल्पनेचे वास्तवातील रूप आहे. उद्योजकाची जडणघडण ज्या प्रकारे झाली आहे, ते उद्योग चालविण्याच्या पद्धतीवरून लक्षात येते. उद्योग असो उद्योजक, शिस्त हि हवीच.
९. निर्णय क्षमता : अचूक निर्णय घेण्याचे कौशल्य हे तुमच्या आकलन शक्ती आणि आलेल्या अनेकविध अनुभवांवर अवलंबून आहे. वेळेवर घेतलेले अचूक निर्णय तुम्हाला आर्थिक फायदे तर देतातच, त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढवितात.
१०. अयोग्य नियोजन : औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक अशा कोणत्याही स्तरावर नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. , उद्योग सुरु करताना , तुमच्याकडे पुढील तीन वर्षांचे नियोजन असणे , गरजेचे . अनेक वेला तुम्हाला योग्य दिशा दाखविण्याच्या काम हे नियोजन तर करतेच, पण त्याचबरोबर अनेक विषयांवर समन्वय आणि आणि प्रश्नांची उकल सुद्धा होते.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे , या उक्तीनुसार आपण वेळेच्या योग्य नियोजनाने आणि मार्गदर्शनाने या १० चक्रव्युहातून मार्ग काढू शकतो.
हो,
हि १० चक्रव्यूह आहेत .
अभ्यास, नियोजन , शिस्त , समन्वय , संयम या शस्त्रांचा आणि शास्त्रांचा योग्य वापर करूनच , आपण यातून मार्ग काढू शकतो.
अनेक नवनवीन समस्या , कधीही न उद्भवलेली परिस्थिती , सतत आ वासून उभे असणारे एकापेक्षा जास्त प्रश्न, अशा अनेक चांगल्या आणि वाईट अनुभवांतून , तावून सुलाखून निघालेले उद्योजकच आपल्या देशाचे भविष्य घडवितात.
आपल्या उद्योजकीय प्रवासासाठी अनेक शुभेच्छा !!
Comments