तुमच्या विचारांचे मूर्त स्वरूप म्हणजे तुमचा उद्योग.
तुम्हाला पटलं ना?
नाही अजून?
जरा समजून घेऊया ...
तुमच्या आजुबाजुला अनेक निरनिराळ्या प्रकारचे उद्योग सुरु आहेत. विशेषतः: जे उद्योग " टिकून " आहेत , त्याची सुरुवात हि तुम्हाला सुचलेल्या एखाद्या "आयडिये" मधून झालेली नाही का ? कधीतरी, केव्हातरी सुचलेल्या या " आयडिया " चे सावधानतेने कल्पनेमध्ये रूपांतर करून, त्यावर निरंतर कष्ट घेत , जे स्वरूप आकाराला येते तोच तुमचा उद्योग नाही का ?
त्याचा पसारा कमी असो अथवा जास्त , एक व्यक्ती अथवा अनेक व्यक्ती त्या कल्पनेवर मेहनत असतील, बँक भांडवल देईल किंवा स्वतः च्या खिशातून पैसे देऊ, परिस्थिती कशीही असली तरी, तुमच्या निराकार कल्पनेचे मूर्त स्वरूप तर आहे ना ?
अशी उद्योगाला जन्म देणारी कल्पना एकदम सुचते का ?
बऱ्याच वेळा नाही.
तुमचे अनुभव, तुमचे वाचन, रोज भेटणाऱ्या व्यक्ती आणि तुमची येणाऱ्या समस्यांकडे पाहण्याची तुमची स्वतःची वैचारिक क्षमता आणि दृष्टिकोन , इ . या सगळ्या घटकांच्या योग्य मिश्रणातून निराकार कल्पेनेचे साकार स्वरूप हळू हळू दिसायला लागते. त्यासाठी लागणार वेळ ठरविता येणे, तितकेसे सुयोग्य नाही. मात्र , प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे त्या संकलपेनचा प्रवास साकार स्वरूपाकडे होण्यासाठी अविरत परिश्रम हवेत. अन्यथा , मोठ्या उद्योगात परावर्तित होण्याचे सामर्थ्य असलेल्या कितीतरी कल्पना केवळ आळस, दुर्लक्ष , कंटाळा यामुळे विचाराच्या पुढील पातळीवर येऊ शकत नाहीत.
असे न होण्यासाठी उद्योग सुरु करण्यास उत्सुक असणाऱ्या सर्वांनी एक गोष्ट कायम मनात ठसविली पाहिजे आणि ती म्हणजे लिहिणे, लिहून काढणे . जसे जमेल तसे लिहून काढणे.
कोणत्याही भाषेत,
तुम्हाला समजेल अशा कोणत्याही स्वररूपात... मोबाईलची मदत सुद्धा घेऊ शकता ...
दिवसातून निदान एकदा तरी लिहिण्याची सवय करून घ्यायलाच पाहिजे.
डायरी / रोजनिशी लिहिण्याची सवय असेल तर फारच उत्तम ... नसेल तर करून घेऊया .. आपल्या रोजच्या दिनक्रमातून थोडासा वेळ काढूया ... आणि फक्त कल्पेने बद्दल लिहिले पाहिजे असे नाही. ते तर नक्की लिहा आणि त्याचबरोबर तुम्हाला दिवसभरात आलेल्या अनुभवाबद्दल , दिवसभरात केलेल्या विशेष कामाबद्दल नक्कीच लिहू शकता...
आणि सगळ्यात महत्त्वाचे हि सुचलेली आयडिया लिहून ठेवली म्हणजे काम झाले असे नाही . तिचा सतत पाठपुरावा करायला पाहिजे.
रोज लिहिण्याचे सवय असेल तर पहा तीन महिन्यात तुमची कप्लना मूर्त स्वरूपात येते कि नाही ते... या सुचलेल्या आयडियेचे उद्योग रूपांतर करू पाहणाऱ्या सर्व उद्योजकांना मन:पूर्वक शुभेच्छा !!
Comments