' उद्योजकता ' विकसित करणे किंवा ' उद्योजकते ' साठी अनुरूप वातावरण तयार करणे, ही एक सामाजिक जबाबदारी आहे. घरातील संस्कारातून किंवा मिळणाऱ्या शिक्षणातून, उद्योग सुरु करण्यासाठी किंवा चालविण्यासाठी लागणारे मूलभूत कौशल्य, विकसित होतेच असे नाही.

आज उद्योग प्रक्षिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक शासकीय आणि बिन - शासकीय संस्था, अनेक शैक्षणिक संस्था, उद्योग अथवा उद्योजकता प्रशिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. अशा कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी, आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रक्षिक्षण हवे आहे ?
कोणत्या प्रकारचे शिक्षण घेणे गरजेचे आहे?
कोणत्या प्रकारचे कौशलय वाढविणे गरजेचे आहे?
कोणत्या ठिकाणी मी हे शिक्षण घेऊ शकतो ?
स्वभावत:च उद्योजकता असलेली व्यक्ती त्याने स्वत: ठरवले तर उत्कृष्ट उद्योजक बनू शकतो. त्याचबरोबर, योग्य नियोजन करून , आवश्यक शिक्षण घेऊन आणि त्याला अविश्रांत मेहनतीची जोड देऊन, तुम्ही स्वतः: ला उयोजक म्हणून प्रस्थापित करू शकता .
केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागात देखील उद्योग प्रशिक्षणाच्या अनेक संधी आपली वाट पाहत आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत तर होईलच, पण देशाच्या विकासातही त्यांचे योगदान राहील.
Comments