' उद्योग - संस्कृती '
- Ms. Harshadaa Potadar
- Nov 30, 2021
- 1 min read
जशी प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख असते, तशी उद्योगाची ही एक संस्कृती असते.
जशी प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख असते, तशी उद्योगाची ही एक संस्कृती असते. म्हणूनच, उद्योग सुरु करतानाच, आपल्या उद्योगाची संस्कृती कशी असायला हवी, याचा विचार झाला पाहिजे. उद्योगाची ओळख ही संस्कृतीवर अवलंबून असते. उद्योगाचे व्यक्तिमत्त्व उभारण्यात , किंवा उद्योगाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व देण्यामध्ये , ही संस्कृती पहिल्यापासूनच निश्चित करावयास हवी.

संस्कृती म्हणजे जीवनशैली.
एखाद्या विशिष्ट लोकसमूहाचे वर्तन कसे असावे?
कोणत्या मूल्यांवर विश्वास ठेवावा ?
एखाद्या विशिष्ट लोकसमूहाचे वर्तन कसे असावे? कोणत्या मूल्यांवर विश्वास ठेवावा ?
आजूबाजूच्या समूहाशी संबंध कसे असावेत? इतिहास, प्रथा, परंपरा, इ . मधून जी मूल्यव्यवस्था तयार होते, ती म्हणजे संस्कृती.
उद्योग - व्यवसायाचे देखील असेच आहे.
जेव्हा आपण एखाद्या ठराविक प्रदेशात कार्यरत असतो, तेव्हा खूप जास्त प्रमाणात एकाच संस्कृतीचे पालन होते. परंतु, जेव्हा अनेक वेगवेगळ्या देशात, प्रदेशात उद्योगाचा विस्तार होते , तेव्हा आपल्या उद्योगाची संस्कृती आणि मूल्यव्यवस्था , वेगळेपण जपण्याचे काम करते.
वेगळा इतिहास, भूगोल, भाषा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, वेळोवेळी प्रशिक्षण देऊन , उद्योग संस्कृती समजावून सांगणे, त्यांना सामावून घेणे, हे प्रत्येक उद्योजकाचे काम आहे.
कोणत्याही उद्योगाच्या यशात , अपयशात त्या उद्योगाच्या संस्कृतीचा खूप मोठा वाट असतो. सर्वसमावेशकत्याच्या पभक्कम पायावर उभी असणारी संस्कृती, उद्योगाला यशापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असते.
Comments