उद्योगसंधी शोधायची कशी?
हा प्रश्न उद्योग करू इच्छिणाऱ्या अनेक जणांना पडतो. उद्योगसंधी ही खरं तर आपल्यासमोरच असते, फक्त तिच्याकडे पाहण्याची दृष्टी आपल्याकडे आहे का?
आपण नोकरी करत असू अथवा व्यवसाय, नवनवीन संधी शोधण्याची डोळस दृष्टी मात्र , प्रयत्नपूर्वक विकसित करता आली पाहिजे.
मागच्या एका वर्षात, जेव्हा संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन होते , अत्यंत अस्थिर परिस्थिती होती, याच वेळी जवळ जवळ ४७ हजार नवीन स्टार्टअप्स सुरु झाले आहेत (इकॉनॉमिक्स सर्वे २०२०-२१ नुसार). इथे हे लक्षात घ्यावयास हवे की , अस्थिर, अत्यंत प्रतिकूल परिस्थियीमध्ये सुद्धा नवनवीन कल्पना राबविल्या जात होत्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम आपण पहातच आहोत.
अनुकूल अथवा प्रतिकूल कोणतीही परिस्थिती असो, उद्योगसंधी तुमच्या समोरच असतात . फक्त, योग्य प्रकारे , पात्र सहकाऱ्यांचे, संघटन करत, ठरलेल्या दिशेला प्रवास झाला पाहिजे. परिश्रम आणि चिकाटी , बरोबरच दृष्टीकोन मात्र हवा .
कित्येकदा एखादी जागतिक आपत्ती ही नाव उद्योजकांसाठी इष्टापत्ती ठरू शकते. आत्मनिर्भर भारत सारख्या योजनांनमुळे अनेक उत्पादने आपल्याकडे उत्पादित करू शकतो . स्वयंपूर्णतेकडे जाऊ शकतो.
दिवाळी भारतातातील सगळ्यात मोठा सण . भविष्यावर प्रभाव टाकणाऱ्या, अनेक औद्योगिक उलाढाली सुद्धा
याच दिवसात होत असतात. दिवाळी हा फक्त प्रकाशाचा उत्सव नाही, तर अनेक उद्योग संधी दाखविणारा , डोळस दृष्टी विकसित करून, कौटुंबिक तसेच सामाजिक जीवन, खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा , संपूर्ण भारतात एकाच वेळी साजरा होणारा उत्सव. धान्य बाजार, फटाके, दिवा, पणत्या, शोभेच्या वस्तू, कापड बाजार, सुकामेवा, मिठाई , अनेकविध भेटवस्तू, इ. आणि अशा अनेक उद्योग व्यवसायाला नवीन उत्साह आणि भरारी देण्याचं काम करणारा असा हा उत्सव.
Comentarios