सतत वाढणारी स्पर्धा आणि नेहमी जाणवणारी आर्थिक टंचाई, या कात्रीत उद्योजक नेहमीच सापडलेला असतो. यश हे प्रत्येकालाच हवे आहे. त्यासाठी, दिवस-रात्र मेहनत करताना , स्वास्थ हरवते आहे का ?
अविचारी धावपळ करताना मनःस्वास्थ , शरीरस्वास्थ आणि गृह स्वास्थ हरवले जात आहे असे आपणास वाटते का ? या तीनही आघाड्यांपैकी , कोणाकडेही दुर्लक्ष करण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
दिवसभराच्या धावपळीत आपण आपल्यासाठी वेळ काढलाच पाहीजे, हे व्यवसायातील महत्त्वाचे, तत्त्व आहे.
उद्योजक म्हणून विकसित व्हायचे असेल तर व्यक्तिमत्त्व विकासावर भर आणि त्यासाठी रोज काही ठराविक दिला पाहिजे. विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन, सम विचारी आणि सकारात्मक मित्रांचा गट असेल तर उत्तमच !! नाहीतर असे मित्र, सहाध्यायी, इ . शोधले पाहिजेत. त्यांच्याबरोबर, आठवड्यातून किमान एकदा चर्चा केली पाहिजे.
नातेवाईकांना वेळ देणे म्हणजे वेळ घावणे, नक्कीच नाही. उलट, त्यांच्याबरोबर एक विश्वासाचे नाते घट्ट बांधून ठेवा. ही सर्व नातेवाईक मंडळी , तुमच्या व्यवसायाची सतत महत्त्वाचे (!) करत असतात आणि तेही अगदी फुकटात .... मात्र, जाहिरात त्यांनी कशी करावी , हे बहुतांशी तुमच्या वागण्यावर अवलंबून असते.
उद्योग करताय ? म्हणजे स्पर्धा असणार आहे. आणि एक उद्योजक किंवा उद्योजिका , म्हणून या तीव्र स्पर्धेचा, तुम्ही देखील एक अविभाज्य भाग आहात . या स्पर्धेच्या युगात आपल्याला फक्त टिकायचे नाही, तर पुढे देखील
जायचे आहे.
रोजच्या अपरिहार्य अशा धावपळीतून थोडा वेळ काढा. ताण हलका करा.
आणि नवीन संधींना सोमोरे जाण्यासाठी सज्ज व्हा .....
खूप खूप शुभेच्छा . . . .
Comments