उत्सवांचा महाउत्सव म्हणजे दिवाळी .
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. दिवाळी म्हणजे सणांचा उत्सव.
आनंद , उत्साह द्विगुणित करणारा दिवाळसण , सर्व अबालवृद्धाना सामावून घेतो.
दिवाळी असा सण आहे , नव्हे सणांचं राजा आहे ज्या सणासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही खरेदी करत असते. अक्षरक्ष : खरेदीचा महा उत्सव या दिवसांमध्ये , संपूर्ण भारतात साजरा होतो. मुळातच भारत हा उत्सवप्रिय माणसांचा देश आहे. या देशात साजरा होणाऱ्या प्रत्येक सणाला, प्रत्येक उत्सवाला धार्मिक, सामाजिक महत्त्व आहे. त्याच बरोबर, व्यावसायिक महत्त्व सुद्धा आहे.
एक उद्योजक म्हणून या उत्सवाकडे बघताना हा उद्योजकतेचा देखील किती मोठा महाउत्सव आहे, हे लक्षात येईल. मागणी आणि पुरवठा या संकल्पना समजून घ्यायच्या असतील ना, तर या सण, उत्सवांकडे डोळस नजरेने बघायला शिकले पाहिजे.
या आठवड्यात सुरु होणाऱ्या या महाउत्सवाच्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा
Comentarios