top of page

उद्योगाचा चौथा " कोन "

Writer's picture: AimSolute SolutionistAimSolute Solutionist

उद्योजकाचा उद्योगाप्रती असलेला ध्यास , आभासपूर्वक तयार केलेला संपूर्ण आराखडा , आवश्यक असलेले भांडवल या त्रयिनसोबतच महत्त्वाचा आहे तो उद्योगाकडे पाहण्याचा उद्योगाचा दृष्टिकोन . अवघ्या काही महिन्यात किंवा वर्षात बंद पडलेले उद्योग आपल्या सर्वांच्या माहितीमध्ये अनेक आहेत. समस्या , अडचणी या तर सगळ्यांच येत असतात . मग काही उद्योग पुढे जाण्यात यशस्वी कसे ठरतात ? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे.

साधे सायकलचे उदाहरण पाहूया ...


सायकल चालविण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. एखाद्या विद्यार्थ्यांसाठी सायकल हे शाळेत पोहोचण्याचे साधन आहे. ५ वर्षाच्या बालकाची सायकल म्हणजे त्याचे जग आहे. चाकरमान्यांची सायकल ही फक्य वाहतुकीसाठी नाही, तर त्याच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. कोण्या व्यक्तीसाठी व्यायामाचे साधन हि त्यांची सायकल आहे. तर काही व्यक्तींच्या पार्किंगमध्ये फक्त दसऱ्याला बाहेर काढली जाणारी सायकल देखील असते .


हो ना ?


दृष्टिकोन महत्त्वाचा... दृष्टी असेल तशी सृष्टी दिसते.


त्याचप्रमाणे , उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा प्रत्येकाचा उद्देश हा वेगवेगळा असू शकतो. त्यातून मिळणारे उत्पन्न हे एक प्राथमिक कारण आहेच. तुमचा उद्योग हेच तुमच्या उदरनिर्वाहाचे साधन एकमेव साधन असेल, तर तुमचे संपूर्ण लक्ष्य हे उद्योगावर असायलाच हवे. जर तुम्ही नोकरी सांभाळून व्यवसाय करत असाल, तर निश्चितपणे तुमचे लक्ष्य हे विभागले जाणार आहे.


उद्योग व्यवसाय कसा करायचा ? यावर अनेकजण मार्गदर्शन करत असतील . पण, उद्योजकाचा दृष्टिकोन कसा असावा ? कसा असायला पाहिजे ? यावर खरे तर उद्योगाचे भवितव्य अवलंबून असते.

Comments


bottom of page