उद्योग सुरु झाल्यानंतर तो पहिल्याच वर्षात बंद पडण्याचे प्रमाण किती आहे ?
पहिल्याच वर्षात बंद पडणाऱ्या उद्योगांची संख्या ही खूप जास्त आहे , भयावह आहे. बंद होणाऱ्या , पडणाऱ्या या अनेक प्रकारच्या उद्योगांच्या कारणे खूप वेगवेगळी आहेत. पण, ढिसाळ नियोजन, आर्थिक नियोजनाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष ही करणे मुख्यत्त्वे आढळून येतात .

आर्थिक नियोजन या मध्ये वैयक्तिक नियोजनाबरोबर उद्योगाचे आर्थिक नियोजन पण अंतर्भूत आहे. हे अनेक वेळा पुढे ढकलले जाते किंवा एकूणच नवं उद्योजक उद्योगाच्या आथिर्क नियोजनाच्या बाबतीत उदासीन असतात. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि नियोजन करताना त्यातील वेगळेपण लक्षात घेणे गरजेचे आहे.
नवीन व्यवसाय सुरु झाला, की त्याला पहिल्या १२ ते १४ महिन्यापर्यंत किती पैसे लागणार ? याचे एक बजेट तयार करणे गरजेचे आहे. जवळ जवळ ९०% नवीन व्यवसाय हे सुरू झाल्यानंतर दोन ते तीन वर्षात बंद पडतात, याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आर्थिक नियोजन नसणे हे आहे. तसेच, बरेच उद्योजक हे सुरुवातीला नोकरी करू त्यांनी जे बचत गेलेले पैसे आहे ते व्यवसायासाठी लावतात, असे पैसे लावताना योग्य रक्कम ही बाजूला काढून ठेवणे गरजेचे आहे.
त्यामुळे, उद्योजकांनी ह्या आर्थिक नियोजनाला फार महत्त्व देणे गरजेचे आहे, यासाठी तुम्ही तुमचे आर्थिक सल्लागार किंवा सीए यांची सुद्धा मदत घेणे गरजेचे आहे. व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला उद्योजक हा फार मोठ्या अपेक्षा करत असतो आणि त्याचे धेय्य फार मोठे मोठे असते परंतु असे ध्येय ठरवताना तुमच्या आर्थिक नियोजनाकडे कानाडोळा करून चालणार नाही.

आर्थिक नियोजन करताना एक कानमंत्र नेहमी लक्षात ठेवावा आणि तो म्हणजे : -
अंथरूण बघून पाय पसरावे
त्याचबरोबर, या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे -
तुमचे व्यवसायाचे खर्च आणि वैयक्तिक खर्च किती आहे याची स्वतंत्र यादी तयार करा.
तुमच्यावर अवलंबून असणारे पालक यांच्या साठी लागणारे खर्च तुमच्यावर अवलंबून असणारे मुले यांच्या साठी लागणारे खर्च याची यादी तयार करा.
अनपेक्षित काही आजारपण येऊ शकते यासाठी लागणारे काही खर्च आहे त्याची यादी तयार करा.
तुमच्याकडे या खर्चासाठी बारा ते चौदा महिने पुरेल इतकी रक्कम तुम्ही बाजूला काढून ठेवणे गरजेचे आहे.
आणि मग उरलेल्या पैशातून तुम्ही व्यवसाय सुरू करून आणि मग बँक कर्ज घेऊन त्या बँक कर्जासाठी किती हप्ते लागणार आहे त्याचीसुद्धा तरतूद करणे गरजेचे आहे.
पुढील पाच वर्षात पुढील पाच वर्षात कोणकोणते प्रकल्प आपण करणार आहोत आणि त्यासाठी कोणती यंत्र स्मूघरी, मनुष्य बळ लागेल, हे डोक्यात पक्के असले पाहिजे.
कमीतकमी पुढील तीन वर्षात लागणारे खर्चाचे सगळे तपशील तुमच्याकडे असायला पाहिजे. ते उद्योग यशाचे गमक होऊ शकते .
चला तर मग वही पेन घ्या आणि तपशील लिहायला सुरुवात करा.
नियोजनाची पहिली पायरी हीच नाही का?
© हर्षदा पोतदार
९१६८५५३९७२
Comments