उद्योजक होण्यासाठी " मानसिकता " किती महत्त्वाची आहे ? हे आपण मागील लेखात पहिले आहेच. पण, उद्योजकीय मानसिकता जोपासायची कशी ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा लेख.
अव्याहतपणे मानसिकतेवर काम करणे आणि उद्योजकीय मानसिकता वाढविण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सकारात्मक राहा.
आपल्या रोजच्या जीवनात सकारात्मकता खूप गरजेची आहे. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत, हे मनात एकदा पक्के ठरवा . उद्योग करताना सगळ्याच गोष्टी आपल्या मानवमाणसाळक्या होणार नाहीत . पण त्यासाठी स्वतः ला दोष न देता प्रयत्न करत राहायला हवेत.
ध्येय निश्चित करा आणि ते मिळविण्यासाठी स्वतः ला सतत प्रेरित करत राहा .
उद्योजक होण्याचे ध्येये हवं तुमचे स्वतः चे ध्येये आहे. बरोबर ना ? हे अंतिम लक्ष्य गाठण्यासाठी रोज सतत प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न करत असताना स्वतः कडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. सदृढ शरीरामध्येच सदृढ मन निवास करत असते .
खंबीर मनाबरोबर लवचिक असणे पण महत्त्वाचे ...
नवीन समस्या या तर येताच राहणार . हो ना?
प्रत्येक समस्येचे उत्तर हे एकाच असू शकत नाही. कित्येक वेळा आपल्या विचारांच्या परिघाबाहेर जाऊन निर्णय घेण्याची वेळ येते., निर्णय घेताना लवचिकता महत्त्वाची .... तरच आपण पुढे मार्गक्रमण करू शकतो.
धोका पत्करणे जरुरी आहे का? याचा आधी पुर्ण अभ्यास करा
नकारात्मक विचारांना ठार देऊ नका
स्वतः ची काळजी घ्या
Comments