top of page

उद्योजिका होताना ....

Writer's picture: AimSolute SolutionistAimSolute Solutionist

भारतीय समाजात नव्याने ' उद्योजक ' म्हणून स्वतःला सिद्ध करणे, वाटते तेवढे सोपे नाही. आणि त्यातही तुम्ही स्वतः ला उद्योजिका म्हणून सिद्ध करू पाहत असाल तर एकाच वेळी , अनेक आघाड्यांवर , घाबरता , न डगमगता , आणि कोणाच्याही पाठिंब्याशिवाय तुम्हाला उभे राहावे , लागणार आहे , याची तयारी असेल तरच पुढे जाऊया ... परिस्थिती खूप काही शिकविते . परिस्थितीपुढे हात ना पसरता , स्वतः: चा स्वाभिमान , कायम ठेवून, उद्योजिका म्हणून स्वतः: ला प्रस्थापित केलेल्या, अनेक मुली, कन्या, महिला आपल्या आजूबाजूला आहेत.

प्रत्येकीची स्वतः ची एक वेगळी "कहाणी" आहे ...


प्रत्येकीचे वेगळे असे "कर्तृत्व" आहे ....


प्रत्येकीचा स्वतः चा एक आगळा "संघर्ष" आहे ....


" उद्योजिका " म्हणून समाजात वावरताना सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे मानसिकता.


उद्योग ( किंवा नोकरी सुद्धा ) तुम्ही कोणत्याही कारणासाठी ( कुटुंबाला हातभार, स्वावलंबन, ध्येय पूर्तीसाठी , आर्थिक गरज म्हणून , इ.) करा ;' समाजाचा एक ठराविक साचेबंद दृष्टिकोन २०२२ मध्येही टिकून आहे.


अशा वेळी भक्कम पाठिंबा हवा असतो तो म्हणजे कुटुंबाचा.. मुख्यत : जोडीदाराचा.


निरनिराळया ठिकाणी केलेल्या पाहणीचे निष्कर्ष हे अजूनही हेच सांगत आहेत की , संसार सभाळून काय ते कर ( ? ) अशी मानसिकता ९० टक्के समाजाची अजूनही आहे आणि उरलेले ९ टक्के समाजात राहायला हवे ना, म्हणून गप्प आहेत.


बाकीच्या एक टक्का वर्गाला , मात्र मन: पूर्वक धन्यवाद.


तुम्ही येता का या एक टक्क्यामध्ये ?


हा एक अवघा टक्का म्हणजे तो सर्व समाज समाज , ते सर्व कुटुंबीय जे विरोध न करता पाठिंबा देतात... पाठिंबा म्हणजे आर्थिक मदत नव्हे ...


भारत देशाचे सर्वोच्च पद जसे राष्ट्रपती संरक्षणमंत्री अर्थमंत्री , भूष वी नाऱ्या महिला या देशातील आहेत , या मातीतील आहेत, तरीदेखील या भारत मातेच्या किती तरी मुलींना, कण्यांना जगण्याचा , शिक्षणाचा मूलभूत हक्क नाकारला जातोय, यापेक्षा दुर्दैव कोणते ?


महिला उद्योजकांना अनेक प्रकारे उभे राहण्यासाठी देखील सर्वार्थाने मदत केल्याची अहेक उदाहरणे आहेत आणि त्या सर्व महिलांनी आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध देखील केली आहे.


अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढण्याची , सजग पणे , नैसर्गिक देणगी खर जन्मत: च यांच्याकडे असते. उद्योजिका म्हणून समोर येण्यासाठी फक्त मार्गदर्शकाची गरज असते आणि ती सुद्धा सुरुवातीच्या काही काळासाठी .....


आज उद्योजिका होण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी लागणारा आत्मविश्वास आणि धाडस मात्र आपल्याला दाखवायचे आहे.


महिला नेतृत्वाने खंबीर पणे सुरू केलेल्या गोष्टी आणि त्यामुळे समाजावर झालेले दूरगामी आणि सकारात्मक परिणाम , याची साक्ष देण्यासाठी , प्रगत मानव जातीचा इतिहास उभा आहे.


इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज आहात ना ?



Comments


bottom of page