" एकल व्यक्तिंशी सुसंवाद साधा. त्यांची सुखदुःख जाणून घ्या. त्यांच्यासाठी वेळ द्या. त्यांना आवश्यकतेनुसार सहकार्य करा. त्यांच्यातील जगण्याची उमेद वाढवा " असे प्रतिपादन विश्वजोडो अभियानाचे संस्थापक, अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. मधुसूदन घाणेकर यांनी केले. १० मार्च २०२४ रोजी झालेल्या, एकल व्यक्तिंच्या सांजभेट संस्थेचा मेळावा आणि खुल्या हास्यकाव्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात डाॅ. मधुसूदन घाणेकर बोलत होते. या कार्यक्रमाचे संयोजन गणेश जामखेडकर, सुचेता प्रभुदेसाई आणि डाॅ.समता कुलकर्णी यांनी केले.
सुधाकर नाईक यांनी आभार मानले. उत्तरार्धात झालेल्या खुल्या हास्यकाव्यसंमेलनात मनीषा सराफ, अपर्णा आंबेडकर, सारिका सासवडे, सुवर्णा जाधव, काव्यश्री पाटील, प्रचेतन पोतदार, गणपत तरंगे आदिंच्या हास्य कवितांनी उत्स्फूर्त दाद मिळवली. समारोपात डाॅ. घाणेकर यांनी हास्य कवितांमधून ' मधुरंग ' आविष्कार गाजवला !
याच सोहळ्यात कवी ॲड. अशोक जाधव यांच्या शुभहस्ते डाॅ. मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनियतकालिकाच्या ४९८ व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
सांजभेट
(स्थापना :२३. ०१. २०२४)
संपर्क : ८३०८८१९०६२
Comments