उद्योग व्यवसायाचा राजा कोण ?
असा प्रश्न कधी पडला आहे का ?
नाही, उद्योग / व्यवसाय सुरु करणारे मालक हे राजे नसतात. वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना राजे समजणे, हे सर्वथा चुकीच्या समजातून घडते. या व्यावसायिक जगात जर कोणी राजा असेल, जर कोणाचे खऱ्या अर्थाने येथे वर्चस्व असेल, तर ते म्हणजे तुमचे ग्राहक.
एका उद्योजकाला किंवा उद्योजिकेला , व्यवसाय किंवा उद्योग , योग्य दिशेने पुढे न्यायचा असेल तर ग्राहकाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याची पहिली पायरी म्हणजे ग्राहकाला समजून घेणे. ग्राहकांना समजून घेणे हे तितकेसे सोपे नाही. या चार प्रकारांपैकी सजगपणे , सावधपणे आणि सतत ही समजून घेण्याची प्रक्रिया चालू राहायला पाहिजे.
ढोबळमानाने ग्राहकांचे चार प्रकार करूया. या चार प्रकारांपैकी केले, तर त्यातले फक्त एक प्रकारचे ग्राहक हे असे असतात, जे फक्त तुमच्याकडून खरेदी करतात आणि त्याचबरोबर बाकीच्यांना देखील प्रवृत्त करतात. दुसऱ्या प्रकारचे ग्राहक हे चोखंदळ प्रकारात येतात. ते स्वात: प्रत्येक गोष्टीची खात्री करतात आणि त्यानंतरच तुमच्यावर विश्वास ठेवतात. त्यांना पटले तर आणि तरच परत परत तुमच्याकडे येतात. तिसऱ्या प्रकारात येणारे ग्राहक हे कोणाच्यातरी सांगण्यावरून तुमच्याकडे आलेले असतात. नवनवीन गोष्टी वापरण्याकडे त्यांचा कल असतो. तुमची उत्तम गुणवत्ता आणि रास्त किंमत याकडे लक्ष न देणारे ग्राहक हे चौथ्या प्रकारात येतात , जे कधीही तुमच्या वस्तूंची खरेदी किंवा प्रशंसा देखील करत नाहीत .
आपल्याकडे येणारे ग्राहक हे कोणत्या प्रकारात येतात? हे सगळ्यात आधी समजून घेतले पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला हवे असलेले ग्राहक आणि ग्राहक यातील फरक ओळखणे गऱजेचे आहे. आपल्याकडे येणारे ग्राहक हे कोणत्या प्रकारात येतात? हे सगळ्यात आधी समजून घेतले पाहिजे. त्यानंतर , जे आपले ग्राहक नाहीत , त्यांना आपले ग्राहक करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. त्याचबरोबर, पहिल्या दोन प्रकारातील ग्राहकांकडे देखील बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. टायचबरोबर त्याचबरोबर आपल्याकडे आलेल्या प्रत्येक ग्राहकाची माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे. जेवढी जास्त माहिती आपण मिळवू शकतो , तेवढे आपल्याला ग्राहकांना समजणे सोपे होते. त्यांच्या खरेदीचा आनंद नक्की कशामध्ये आहे ?
कोणत्या गोष्टीसाठी - गुणवत्ता , किंमंत, घरपोच , इ . - ते तुमच्याकडे येतात ?
ते परत तुमच्याकडे येतात का ?
की फक्त एकदा खरेदी करणारे ग्राहक तुमच्याकडे जास्त आहेत ?
ते तुमच्या वस्तू अथवा सेवेबद्दल बोलताना सकारात्मक असतात का ?
समाज माध्यमांवर किंवा प्रत्यक्षपणे तुमच्या विषयी बोलतात का ?
या आणि या अनुषंगाने येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधून , त्यानुसार तुमच्या प्रक्रियेत, तुमच्या गुणवत्तेत , तुमच्या संपर्क करण्याच्या व्यवस्थेमध्ये योग्य तो बदल करणे आणि गुणवत्तेच्या वाटेवर सातत्यपूर्ण चालत राहणे, हीच ग्राहकांपर्यत पोहोचणाची, त्यांना समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे.
© हर्षदा पोतदार
९१६८५५३९७२
留言