ग्राहक, हा खऱ्या अर्थाने, आपल्या व्यवसायाचा पाया आहे. ग्राहकांच्या पाठिंबा असल्याशिवाय आणि त्यांच्या पाठबळाशिवाय कोणताही व्यवसाय स्थिर होऊ शकत नाही. ग्राहक म्हणजे खऱ्या अर्थाने उद्योग व्यवसायाची गाडी नेहमी रुळावर ठेवायची असेल तर ग्राहकांना समाधानी ठेवा. त्यांना समाधानी ठेवता आले पाहिजे. तुमच्या वस्तू किंवा सेवेचे वेगळेपण , गुणवत्ता , रास्त दर या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी ग्राहकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.
पण, तुम्हाला हे माहित आहे का "ग्राहक" म्हणजे नक्की कोण?
कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेणारी वा अशी वस्तू किंवा सेवा वापरणारी व्यक्ती, ग्राहक सरंक्षण कायदा कायद्यानुसार. ग्राहक म्हणून ओळखली जाते. वस्तू व सेवा खरेदी करणारी व्यक्ती स्वतः उपभोक्ता असेल तर ती व्यक्ती ग्राहक या संज्ञेस पात्र ठरेल.
ग्राहक दुकानात आले, त्यांनी वस्तू / सेवा विकत घेतल्या. या विक्रीतून होणारा नफा व्यावसायिकाला प्रगतीपथावर नेण्यास आणि राहण्यास मदत करतो.
आपल्या वस्तूंकडे / सेवांकडे वाळविण्यासाठी विशेष कष्ट मात्र ज्ञावे लागतात. ग्राहकाला आपल्या वस्तूंकडे / सेवांकडे वाळविण्यासाठी विशेष कष्ट मात्र ज्ञावे लागतात. हे ग्राहक आपल्याकडे का येतात किंवा का येत नाहीत ?, याचा सखोल अभ्यास करायला हवा. व्यवसायाची गमक खर तर आपल्या ग्राहकांना ओळखण्यात आहे.
आता पुढचा प्रश्न आपले ग्राहक कोणते?
आपल्या सेवा किंवा उत्पादनासाठी योग्य ग्राहक कोणते आहेत, हे समजणे गरजेचे आहे.
दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक किंवा चौकशीसाठी प्रत्येक येणारा फोन हा आपल्या ग्राहकाचा असतो का?
नाही.
हो, प्रत्येक ग्राहक हा "आपला ग्राहक" नसतो.
आपल्याला हवे असलेले ग्राहक आणि ग्राहक यातील फरक ओळखणे गऱजेचे आहे. आपले ग्राहक हे आपल्यायाला पदोपदी मार्ग दाखवितात , उभे राहण्यास मदत करतात. आपण कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत असले तरी हे प्रथम लक्षात घ्या, की -
आपण कुठल्या प्रकारच्या ग्राहकांकरिता हा व्यवसाय सुरू केला आहे?
कुठले ग्राहक आपल्याकडे वारंवार परत येतात?
आपल्या व्यवसायाशी निष्ठावान असलेले ग्राहक कोण?
त्यांची कारणे काय आहे?
एकदाच येणारे आणि वारंवार येणारे ग्राहक कोणते?
ते नेहमी कोणत्या वस्तू ( किंवा सेवा) घेण्यासाठी आपल्याकडे येतात ?
आपण त्यांना अजून काही देणे गरजेचे आहे का? आपले ग्राहक आपल्या स्पर्धकडे जातात का ? कशासाठी?
या आणि अशा गोष्टींचा सतत अभ्यास करून , अद्ययावत राहता आले तरच ग्राहक आपल्याकडे टिकून राहतील.
तुम्ही ग्राहकांची काळजी घ्या. ते तुमच्या व्यवसायाची घेतील .
आपले ग्राहक कोण? हे पक्के झाले की आपले सारे लक्ष या वर्गावर केंद्रित करा.तसेच, त्यांना ज्या गोष्टी जास्त आवडतात त्याकडे लक्ष द्या. असे केल्यावर ग्राहक आपल्या दुकानातील जास्तीत जास्त उत्पादने खरेदी करतो.
ग्राहकांची संख्या वाढत जाणे, ही व्यवसायाच्या दीर्घकालीन यशाची खात्री असते. बाजारपेठ काबीज करून , व्यवसायात यशस्वी होण्याची किल्ली या 'ग्राहका ' कडे आहे. आणि या 'ग्राहक' रुपी देवाला , सतत प्रसन्न ठेवण्यासाठी एकच व्रत अंगिकारले पाहिजे , ते म्हणजे 'सातत्य आणि गुणवत्तापूर्ण ग्राहक सेवा'
Comments