top of page

चला, व्यवसाय साक्षर होऊया

Writer's picture: Ms. Harshadaa PotadarMs. Harshadaa Potadar

हो .

उद्योग साक्षरता किंवा व्यवसाय साक्षरता ही आजच्या समाजाची गरज आहे.


माहिती तंत्रज्ञान (IT), जैव तंत्रज्ञान (BT), नॅनो तंत्रज्ञान (NT) या आणि अशा इतर क्षेत्रांमध्ये होत असलेली क्रांती , आणि त्या अनुषंगाने आपल्या दैनंदिन जीवनात होणारे आमूलाग्र बदल , या सर्व पार्श्वभुमीवर, व्यवसाय साक्षरतेची गरज ही अजूनच अधोरेखित होते.


आजच्या काळात ' उद्योजक' होण्याची पहिली पायरी ही - व्यवसाय सुरु करणे , ही नसून, आधी , सर्वात पहिल्यांदा व्यायसाय साक्षर होणे , ही आहे. आणि सर्वात महत्त्वाचे फक्त उद्योजकच नाही, तर प्रत्येक सज्ञान नागरिकाला या मूलभूत गोष्टींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून या गोष्टी समजून हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे.


तुम्ही विद्यार्थी आहेत का?

घरचा व्यवसाय सांभाळत आहात का ?

नवीन उद्योगाची स्वप्ने पाहत आहात का ?

व्यवसायामध्ये बदल शोधात आहेत का?

नवीन नोकरीच्या शोधात आहात ?


थोडक्यात काय , तर तुम्ही कोणीही असा ; व्यवसाय साक्षरतेला पर्याय नाही.


साक्षरता म्हणजे नेमके काय हे एकदा आपण समजून घेऊया.


साक्षरता म्हणजे फक्त लिहिणे, वाचणे किंवा पदवी मिळवणे इतकेच मर्यादित नाही. लिहिता, वाचता येणारी माणसं पण कधीकधी निरक्षरासारखे वागतात. किंवा पदवी घेतलेले अनेक जण आर्थिक मायाजालात फसतात.


साक्षरता म्हणजे प्रत्येक नागरिकाला लिहिता व वाचता येण्याच्या बरोबरच त्यांना त्यांच्या हक्काची, कर्तव्यांची, तसेच देशातील मूल्यांची जाणीव असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे.एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी वा ज्ञानार्जनासाठी या माहितीचा उपयोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे साक्षरता होय.


साक्षरता, शिक्षण आणि सामाजिक जाणीव असलेला समाजच देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आज आपल्या देशातील संथ झालेल्या उद्योग क्षेत्राला गती देण्याचे काम हे उदयोन्मुख उद्योजकच अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतात . कल्पनांनी आणि परिश्रम घेण्याची तयारी तर प्रत्येकाकडे आहे. त्याचबरोबर, व्ययसाय साक्षर होण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले, तर यश आपल्याकडे धावत येईल.


जोपर्यंत पैशाचे महत्व समजत नाही तोपर्यंत पैसे कमावण्यापेक्षा गमावण्यात जास्त मजा येते. येथे आर्थिक साक्षरतेचे संस्कार झाले पाहिजेत. सदृढ समाज सर्वांगीण दृष्टया विकसित होण्यासाठी , अगदी लहान वयापासून , व्यायसायिक साक्षरतेचे संस्कार होणे गरजेचे आहेत.




चला तर मग , व्यवसाय साक्षर होऊया ....


Comments


bottom of page