उद्योग सुरु करण्याचे स्वप्न पाहणारा प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या आयुष्यात उद्योजक म्हणून प्रस्थापित करू शकेलच , असे नाही. यशस्वी उद्योजकांचे अनुभव, त्यांची प्रेरणादायी चरित्रे वाचून , ऐकून मार्गदर्शन नक्कीच मिळते. पण, उद्योजक होण्यासाठीचा प्रत्येकाचा अभ्यासक्रम आणि त्याची परीक्षा ही पूर्णपणे वेगळी असते.
उद्योग कसा सुरु करायचा ?
नक्की सुरुवात कुठून करायची ?
काही विशेष अभ्रासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे का?
असेल तर कुठे ? किती दिवस?
हे जे मोठे उद्योजक आहेत ते कसे सुरुवात करतात?
सध्या भारतामध्ये उद्योगासाठी फार पोषक वातावरण तयार होत आहे. उद्योग सुरु करण्यासाठी सरकारही स्टार्टअप इंडिया सारख्या योजनांमधून प्रोहत्सान देत आहे. स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी खालिल काही स्टेप्स आहेत.
१) उद्योग चालवण्याचा प्लॅन तयार करा.
म्हणजे आपाल्याला कोणता व्यवसाय सुरु करायचाय हे आधी ठरवा. त्या व्यवसायातून नफा कसा मिळेल, व्यवसायाचा मुख्य ग्राहक वर्ग कोण असेल, या उद्योगासाठी योग्य कामगार वर्ग कसा उपलब्ध होईल या गोष्टी एका ठिकाणी लिहून ठेवा. याचा उपयोग तुम्हाला तुमचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी होईल.
2) व्यवसायासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे का हे तपासून पहा.
उदा. शेळीपालन कसे करावे यासाठी काही विद्यापीठे तसेच खाजगी संस्था प्रशिक्षण देतात. गरजेनुसार प्रशिक्षण घ्या.
३) उद्योगासाठी योग्य जागा निवडा. ,
ग्राहकांसाठी सोयीस्कर आणि तिथल्या सरकारच्या नियमात बसेल अशी जागा निवड.
४) उद्योगासाठी किती आर्थिक तरतूद लागेल याचा अंदाज काढा.
त्यानुसार कर्ज हवे असेल तर सरकारी योजना किंवा सबसिडी मिळेल का याची चाचपणी करा. यासाठी तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या तत्सम विभागात संपर्क करू शकता.
५) कायदेशीर बाबींचा विचार करून व्यवसाय पार्टनरशिप मध्ये करायचा कि स्वतःच्या नावाने proprietorship करायचे हे ठरवा.
६) व्यवसायाची नोंद सारकारी दप्तरी करून घ्या.
तुम्हाला कोणता कर भरावा लागेल हे लक्षात घ्या.
७) उद्योगासाठी अवश्यक तो परवाना घ्या. उदाहरणार्थ, किराणा मालाचे दुकान सुरु करण्यासाठी शॉप ऍक्ट काढा.
८) योग्य ते मनुष्यबळ शोधा
वरील सर्व गोष्टी सोडून त्या व्यवसायातील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन सुद्धा खूप उपयुक्त ठरते. भारत सरकारने नवीन उद्योगांसाठी ठराविक उत्पनाखालील व्यवसायांना कर सवलत दिलेली आहे. भारत सरकारची http://startupindia.gov.in हि वेबसाईट तुम्ही बघू शकता.
©
हर्षदा पोतदार
+९१ ९१६८५५३९७२
Comments