असा प्रश्न कधी पडला आहे का तुम्हाला की , उद्योजकाचे किंवा उद्योजिकेचे प्रथम " कर्तव्य " काय ?
की कर्तव्य हा शब्द वाचूनच दोन पावले मागे गेलात ?

पहा ना -
इतक्या सगळ्या अडथळ्यांवर, सर्व प्रकारच्या चांगल्या - वाईट अनुभवांवर, मात करत जेव्हा एखादी व्यक्ती ' उद्योजक ' किंवा ' उद्योजिका ', म्हणून प्रस्थापित होते, प्रस्थापित करू पाहते ; तेव्हा समाजाची त्या व्यक्तीकडे पाहण्याची दृष्टी नक्कीच बदललेली असते.
पण, उद्योजकाच्या दृष्टीने प्रथम कर्तव्य काय असेल तर ते समाजात बदल घडविणे ... सकारात्मक बदल
हा बदल मग एखाद्या समस्येचे उत्तर असेल,
रोजच्याच समस्येचे एखादे नवीन उत्तर असेल ,
एखादी प्रक्रिया सोपी करण्याची नावीन्यपूर्ण पद्धत असेल किंवा आणखी काही....
त्याचबरोबर, या उत्तरामुळे, या नवीन पध्द्तीमुळे , जे ' संभाव्य ' बदल , या समाजात होणार आहेत , या बदलांना सामोरे जाण्यासाठी, जनमानस तयार करण्याची जबाबदारी देखील उद्योजकांची आहे ,

समाजाची गरज लक्षात घेऊन, सर्वोत्कृष्ट सेवा देण्यात राहुल बजाज यांचा हात कोण धरू शकेल का ?
कोणतेही इंधन आणि कुठलाही वाहन चालविण्याचा परवाना न लागणारी सायकल
ते
पेट्रोल वर चालणारी दुचाकी ( हमारा बजाज स्कुटर)
भारतीय वाहन क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन संपूर्णतः: बदलणारा हा , १९ व्या शतकातील ' बदल' .
बदल फक्त सामान्य माणसाच्या रोजच्या वापरातील वाहनात नाही झाला... तो बदल त्याच्या मानसिकतेत देखील झाला आणि समाजाच्या सर्व स्तरांमध्ये झाला....
तस पाहिले तर बदल ही एकच अशी गोष्ट आहे जी कधीही बदलत नाही.
बदल अत्यावश्यक पण आहे. बदलाला सामोरे जायचे का नाही ? हा प्रश्न तसा दुय्यमच.. कारण, बदल एवढा सक्षम असतो की तो तुम्हाला , तुमची इच्छा न विचारता , सामावून घेतो.
बदल हा शाश्वत आहे.
एक उद्योजक म्हणून विकसित होताना फक्त कामाची पद्धत बदलत नाही, तर सर्वात मुख्य बदल हा मानसिकतेत होणे, अपेक्षित आणि अनिवार्य आहे.
चला तर मग, बदलाचे स्वागत करूया ....
Comments