top of page

"जनसंपर्क" म्हणजे "प्रचार" नव्हे

Writer: Ms. Harshadaa PotadarMs. Harshadaa Potadar

व्यवस्थापनाच्या कार्यांपैकी हे एक महत्वाचे कार्य मानले जाते. यामध्ये लोकांचा आपल्या संस्थेविषयीचा कल अजमावणे, तिच्या धोरणांचा व कार्यपद्धतीचा लोकहिताशी मेळ साधणे व लोकांच्या सदिच्छा मिळविणे यांचा समावेश होतो. संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी व संस्थेचे महत्त्व आणि तिचा उपयोग लोकांना पटवून देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्नही जनसंपर्कातच मोडतात. मात्र जनसंपर्क म्हणजे प्रचार नव्हे.





पहिल्या जागतिक युद्धानंतरच्या वीस वर्षांत अमेरिकेत जनसंपर्क व्यवसायाचा खूपच विकास झाला आणि अनेक व्यवसायतज्ञ उद्योगसंस्थांना जनसंपर्क साधण्यासाठी सल्ला देऊ लागले. साहजिकच त्यांच्यापैकी काहींनी फसवेगिरी करून संस्थांना लुबाडलेदेखील. विद्यापीठांतील काही नामवंत प्राध्यापकही या व्यवसायात शिरले व त्यांनी व्यवसायाचा दर्जा उंचावण्यास मदत केली. विशेषतः त्यांनी लोकमत संशोधनाचे तंत्र शास्त्रीय पद्धतीने हाताळले. अशा व्यक्तींमध्ये जॉर्ज गॅलप, क्लॉड, रॉबिन्सन व रेक्स हार्लो यांची प्रामुख्याने गणना होते.


शासकीय संस्थांना जनसंपर्काची गरज भासू लागली, तेव्हा माहिती संचालक वा माहिती संशोधन अधीक्षक अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुका होऊ लागल्या. ब्रिटनमध्ये साम्राज्य विपणन मंडळाने १९२४ मध्ये व्यापाराचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क साधला. दुसऱ्या महायुद्धात तर ब्रिटन आणि अमेरिका या देशांत शासकीय विभागांनी जनसंपर्क संचालक नेमले. भारतात जनसंपर्काची थोडीफार जबाबदारी माहिती व नभोवाणी मंत्रालय व राज्य जनसंपर्क संचालक यांकडे असते. निरनिराळ्या राष्ट्रांतील सत्ताधारी पक्षाच्या संघटनादेखील ही जबाबदारी बऱ्यांच अंशी पार पाडीत असतात.

Comments


©2024 by AimSolute.

  • Facebook
  • LinkedIn
  • YouTube
bottom of page