top of page
Writer's pictureMs. Harshadaa Potadar

जागतिक बौध्दिक संपदा दिवस

पेटंट, कॉपीराईट हे शब्द रोजच्या जीबवणात आपण अनेकदा वापरतो. पण, म्हणजे नक्की काय ? याची कल्पना आपल्याला पैकी किती जणांना आहे ? या बौद्धिक संपदाचा आपल्या रोजच्या जीवनावर होणारा , प्रभाव प्रत्यक्ष आणि अ प्रत्यक्ष प्रभाव , मात्र सर्वज्ञात आहे.


आपल्या रोजच्या जीवनावर असणारा बौद्धिक संपदेकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. बौद्धिक संपदेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि कल्पकतेला प्रोत्साहन देणे , या उद्देशाने जागतिक स्तरावर , बौद्धिक संपदा दिवस , साजरा केला जातो.


जगभरात आजचा दिवस - २६ एप्रिल 'बौद्धिक संपदा दिवस' म्हणून साजरा होतो. कुठलीही आणि कुणाचीही निर्मिती, ही त्याची वैयक्तिक संपत्ती मानून त्याचा व्यावसायिक वापर करण्यापूर्वी परवानगी घेणे, नामनिर्देश अथवा किंमत मोजून वापरणे आवश्यक आहे, याची जागृती करण्याचा दिवस.


२००० सालापासून औपचारिकरीत्या हा दिवस साजरा करतात. याच दिवशी मूर्त स्वरूपात विपो ही संस्था सुरू झाली. बौद्धिक संपदेमध्ये साहित्य, कला, संगीत, चिन्हे- आकृती, उत्पादन, त्यासाठीच्या विविध पद्धती, हे सर्व आलेच, पण त्याचा आवाका आणखीही मोठा आहे. एखाद्याच्या व्यावसायिक फायद्यावर गदा आली तर तो बौद्धिक संपदा हक्क दाखवून भरपाईसाठी उभा राहू शकतो.त्यासाठीचे नियम, नुकसानभरपाईची मोजणी , त्यासाठीच्या पद्धती -आता निश्चित केले गेले आहेत.


बौद्धिक संपदा हक्क (IPR) आता ऐकून ऐकून आपल्या चांगले परिचित झालेत. तरी 'चलता है ' संस्कृतीतून आपण पूर्णपणे बाहेर पडलो नसल्याने हे हक्क जोपासणाऱ्यांपेक्षा ते पायदळी तुडवणारेच जास्त दिसत आहेत . त्यासाठी कायदे आहेतच, कठोर अंमलबजावणी झाली तर ओझे वाटण्याऐवजी बौद्धिक संपदेचा आदर करायला लागू अन प्रगत समाज होऊन पुढे जाऊया !


Comentários


bottom of page