रामनवमीच्या दिवशी दिनांक १० एप्रिल,२०२२ रोजी, गोरेगाव येथील जय लीला बँक्वेट हॉल मध्ये, ABCD इंटरनॅशनल फॅमिली तर्फे " ट्रेलब्लेझर्स ऑफ द इयर - २०२२ " या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन ABCD इंटरनॅशनल फॅमिलीचे संस्थापक श्री.आकाश भाबड आणि प्रोटोकॉल अधिकारी आणि मार्गदर्शक डॉ. प्रतिक राजन मुणगेकर यांनी केले.
दुपारी ४:३० वाजता कार्यक्रम सोहळ्याला सुरुवात झाली. पुस्तक प्रकाशन, पुरस्कार सोहळा आणि आंतरराष्ट्रीय चर्चा, अशा तीन टप्प्यात , हा छोटेखानी सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाभारताचे भाष्यकार मा. श्री. दाजी पणशीकर, इस्त्रोचे शास्त्रज्ञ मा. श्री. डॉ. टी. एन्. सुरेश कुमार, तसेच सम्मानीय अतिथि IIU विद्यापीठाचे संस्थापक मा. श्री. पीयूष पंडित , मुंबई विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मा. श्री. दत्तात्रय खोत हे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. रचना भीमराजका आणि डॉ. प्रतिक राजन मुणगेकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.
अर्चना बर्मन, साक्षी चोथनी, डॉ पल्लवी विश्वास, प्रा. डॉ. प्रतिक राजन मुणगेकर या लेखकांचे अनुक्रमे पुस्तक प्रकाशन झाले. प्रत्येक लेखकाने आपल्या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करुन दिला.
डॉ. प्रतिक राजन मुणगेकर यांच्या शिक्षण ही शाश्वत संपत्ती (Education an eternal asset) या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर शिक्षण क्षेत्रात काय बदल हवे होते? आणि काय व्हायला पाहिजे? याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले. ABCD इंटरनॅशनल फॅमिलीचे Anthology कव्हर लॉन्च करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पुरस्कारकर्त्यांना "ट्रेलब्लेझर्स ऑफ द इयर - २०२२ " ने सन्मानित करण्यात आले : - श्री. नितीन माने, डॉ. उषा राजगोपालन, डॉ. प्रतिभा कदम, दीक्षा सुखरिया, चेतना पवार, स्वाती अरोरा,डॉ. वीणा सपनाेश,श्री गणेश पाटील, डॉ. कु.अनुप्रिया गावडे, डॉ. रसिका फडके, दीक्षा सुखरिया, डॉ. प्रतिक मुणगेकर, डॉ. मनोज सैगल यांना सन्मानित करण्यात आले. IIU विद्यापीठाचे संस्थापक मा. श्री. पीयूष पंडित , मुंबई विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मा. श्री. दत्तात्रय खोत या अतिथींचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या दहा वर्षीय कु. डॉ. अनुप्रिया गावडे हिला मानद डॉक्टरेट डॉ. टी.एन्. सुरेश कुमार आणि मा. श्री. दाजी पणशीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
ABCD इंटरनॅशनल फॅमेलि तर्फे आंतरराष्ट्रीय चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चा सत्रात वक्त्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. अनुक्रमे चर्चासत्रात सहभागी झालेले वक्ते:- सोनल झा, डॉ. उषा राजगोपालन, डॉ. प्रतिभा मिश्रा, डॉ. पल्लवी विश्वास, साक्षी चोथनी, स्वाती अरोरा, रचना भीमराजका, डॉ. प्रतिक मुणगेकर.
या कार्यक्रमाचा तिसरा- शेवटचा टप्पा म्हणजे जीवनगौरव पुरस्कार. या कार्यक्रमातील पहिला जीवनगौरव पुरस्कार हा डॉ. टी. एन्.सुरेश कुमार यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. तर दुसरा जीवन गौरव पुरस्कार श्री. दाजी पणशीकर यांना त्यांच्या असामान्य कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. श्री. दाजी पणशीकर यांनी आपल्या अमोघ वाणीने मार्गदर्शनपर भाषण संमिश्र भाषेत केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर प्रतिक मुणगेकर यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे मनापासून आभार मानले.
Comments