AimSolute च्या वाचकांना डॉ राजू रामेकर हे नाव नवीन नाही. पण, आजच्या लेखाचे निमित्त मात्र नवीन आहे . निमित्त आहे त्यांनी नुकताच मिळविलेल्या एका नवीन Copyright चे ....

इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय भाषा. पण, कित्येक वेळा या आंतरराष्ट्रीय भाषेच्या ' अति ' वापरामुळे , आपल्या भारतीय भाषांना आणि त्यांच्या वैशिष्ट्यांना आपण विसरलो आहोत का ?
किंवा प्रत्येक भारतीय भाषेची 'समृद्ध' करणारी वैशिष्ट्य, आपण पुढील पिढयांपर्यंत पोहोचवत आहोत का?
या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांच्या ध्यासातून, वेळोवेळी केलेल्या विचार मंथनातून जन्म झाला तो ' ळ ' या अक्षराच्या Copyright चा..
आणि आता डॉ. राजू रामेकर यांनी हे नवीन Copyright मिळविले आहे, जे आहे ट ठ ड ढ ण ष च्या संदर्भात .... या अक्षरांची मूळ ओळख कायम ठेवत , ही सर्व अक्षरे इंग्लिश आणि इतर भाषांमध्ये कशी वापरायची, याबद्दल त्यांनी केलेलं कार्य अभिमानास्पद आहे.




भारतीय भाषा आणि समृद्धता , याचा ध्यास घेतलेले , डॉ. राजू रामेकर, यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .
Commentaires