गुंतवणूक ही आर्थिक, भावनिक, वैचारिक आणि अनेक प्रकारची असू शकते. गुंतवणूक का शब्द अधिक वेळा 'आर्थिक गुंतवणूक' म्हणून वापरला जातो. गुंतवणूक आणि आर्थिक गुंतवणूक , या दोन संकप्लना जवळजवळ समानार्थी शब्द, किंवा एकमेकांना पर्याय म्हणून पहिले जातात.
असे असले तरी प्रत्येकाच्या लेखी गुंतवणुकीचा अर्थ खूप वेगवेगळा आणि अनेक पैलू असलेला असू शकतो.
उदाहरणच द्यायचे झाले तर सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक एखाद्या गुंतवणूकदारासाठी मुलीच्या लग्नाची तरतूद असू शकेल. तर दुसऱ्यासाठी सोन्याचे भाव वाढल्यानंतर त्यातून नफा कमविण्याची संधी सुद्धाअसू शकेल.
तसेच, स्थावर मालमत्तेचेही आहे.
जेव्हा आर्थिक गुंतवणूक केली जाते, तेव्हा गुंतवणूकदार भांडवलवृद्धी, सुरक्षितता, भाववाढीवर मात, करबचत या उद्दिष्टांचा प्रामुख्याने विचार करतो. आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय हे भावनिक गुंतवणूक न करता घायला हवेत. अर्थसाक्षर असाल तर या सर्व गोष्टींचा अंदाज यायला नक्कीच मदत होते.
गुंतवणूक याबरोबरच काही अल्पकालीन व काही दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचारही गुंतवणूक करताना केला जातो. बचतीच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते, तेव्हा व्यावहारिक, काळजीपूर्वक तसेच कालसुसंगत अशा गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करणे अपरिहार्य असते.
गुंतवणूक मोठ्या रकमेचीच करावी, असा काही नियम नाही. दर महिन्याला नियमित आणि छोट्या रकमेपासूनही तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. थेंबे थेंबे तळे साचे अशी म्हण आपल्याकडे आहे. छोट्या छोट्या गुंतवणुकीतूनही भविष्यात मोठा फंड तुमच्याकडे तयार होऊ शकतो. तुम्ही घर घेणं, मुलांचं शिक्षण, मुलांचे विवाह किंवा निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं नियोजन करत असाल, तर या नियोजनाला अंतिम रूप देण्यासाठी या गुंतवणुकीच्या मार्गाचा अवलंब करा.
भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक (Investment) करणं हे फायदेशीर असतं. परंतु, नेमकी कुठे, कशी आणि केव्हा गुंतवणूक करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. तुम्ही अर्थसाक्षर मात्र व्हा. घेतात.
काही व्यावसायिक मात्र गुंतवणुकीच्या वित्तीय पर्यायांपेक्षा आपल्या व्यवसायातील मालमत्ता वाढविण्यासाठीअधिक प्रयत्नशीलअसतात, ज्याचा त्यांना निश्चितपणे उत्पन्न वाढविण्यासाठी उपयोग होतो.
खरी गुंतवणूक ही प्रामुख्याने दीर्घकालीन असावी. परंतू आजकाल उपलब्ध झालेले पर्याय व आक्रमक विपणन कौशल्यामुळे गुंतवणूकादारांना भूलवून टाकणारे अल्पकालिन, अति अल्पकालिन गुंतवणुकीचे पर्याय पद्धतशीरपणे पसरविले जात आहेत. याच अल्पकालिन पर्यायांमुळे विशेषतः डे ट्रेडिंग किंवा शॉर्ट सेल सारख्या पर्यायांमुळे शेअरबाजारातील गुंतवणुकीला काही विश्लेषकांकडून सट्टा बाजार म्हटले जाऊ लागले आहे.
आर्थिक गुंतावूणुकीच्या पलीकडे जाऊन, माणसांमध्ये केलेली गुंतवणूक ही सगळ्यात जास्त उत्पन्न देऊन जाते
हो ना ?
Comentários