नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा !
हिंदू पंचांगानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधित जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!
Comentarios