नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले ना ?
- Ms. Harshadaa Potadar
- Apr 2, 2024
- 1 min read
Updated: Apr 15, 2024
नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले ना?
मग तुम्ही तयार आहात ना ! या नवीन आर्थिक वर्षात या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका :

मागील आर्थिक वर्षात झालेले सर्व खर्च , विशेषतः अनावश्यक खर्च का झाले ? आणि ते कसे टाळता येतील ? याचा आढावा घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा.
प्रत्येक महिन्याचे आर्थिक ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार सगळे नियोजन करा.
कोणतीही आणि कोणत्याही प्रकारची देणी , कर्जाचे हप्ते थकवू नका.
IT रिटर्न वेळेवर फाईल करा. आणि इतर सर्व टॅक्सेस वेळेवर भरण्याची तरतूद आधीच करून ठेवा.
दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवा आणि ती रक्कम वाढेल असे नियोजन करा.
आपले व्यावसायिक संबंध दृढ राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा.
सर्वात महत्त्वाचे - रोजचा हिशेब, कितीही लहान रक्कम असो, लिहून ठेवा. हाताने लिहा किंवा तंत्रज्ञानाचा आधार घ्या. पण त्याच दिवशी नोंद करून ठेवा .
© हर्षदा पोतदार
+९१ ९१६८५५३९७२
Comentários