top of page

" पर्यावरण " नाही , तर स्वतःला वाचवूया

Writer's picture: Ms. Harshadaa PotadarMs. Harshadaa Potadar

Updated: Jun 15, 2021

मागील काही दिवसात ,ऑक्सिजन हा शब्द इतक्या वेळा ऐकला की तो शब्दच आता त्या शब्दातीलच "प्राणवायु"

संपेल कि काय?, अशी धास्ती वाटायला लागली आहे. आपल्या आजूबाजूला अगदी मुबलक प्रमाणात असणारा प्राणवायु . जे वायु आपल्याया प्राणशक्ती देतो, तो प्राणवायु. आणि ते पण न मागता, अगदी अव्याहतपणे...



पर्यावरण म्हणजे फक्त पाने - फुले नाही, फक्त वनसंपत्ती आणि जंगले ही नाही. तर, पर्यावरण म्हणजे परिसंस्था, पर्यावरण म्हणजे अनुकूलता.

प्रतिकूलतेकडून अनुकूलतेकडे होणारा " शाश्वत " प्रवास म्हणजे पर्यावरण.

पर्यावरण म्हणजे सृष्टी. येथील चराचरांना सामावून घेणारी व्यापक दृष्टी. या सृष्टीमध्ये सामावलेल्या अनेक सजीवांपैकी आपण एक आहोत. सृष्टी आहे , म्हणून मानवाचे अस्तित्व आहे.


एक ' उद्योजक ' म्हणून, आणि समाजाचा ' जबाबदार ' नागरिक म्हणून , आपले सर्वांचे पर्यावरण - सरंक्षण , संगोपन आणि संवर्धन , हे प्रथम कर्तव्य आहे आणि असेल. आपल्या उद्योग - व्यवसायाचा आणि पर्यावरणाचा काय संबंध ? हा प्रश्नच मुळी चुकीचा आहे. समृध्द आणि सर्वसमावेशक पर्यावरण हे टिकवलेच पाहिजे आणि हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत राखला पाहिजे. तरच, ' तुम्ही', 'मी' आणि 'आपण' अस्तित्वात असणार आहोत... आणि जर आपण अस्तित्वात असाल, तर आपला उद्योग अस्तित्वात असेल.

नाही का?


चला, तर मग ... हे सोपे उपाय आपण अमलात आणूया . :

  • सौरऊर्जेचा वापर

  • पर्यावरण पूरक पॅकेजिंग

  • जास्तीत जास्त वस्तूंचा पुनर्वापर

  • प्लस्टिक सारख्या अविघटनशील घटकांपासून बनलेल्या वस्तूंचा कमीतकमी वापर

  • स्वयं प्रेरणेने, आठवड्यातील एक दिवस ' सायकल दिन ' ( ३ जून सोडून ) अथवा सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर

  • अशा नवीन प्रक्रिया तयार करूया , ज्यामध्ये अगदी कमीत कमी प्रमाणात e -waste (इलेक्ट्रॉनिक्स कचरा) निघेल.

  • आपल्या घरात, कार्यशाळेत, वसाहतीमध्ये , भरपूर प्राणवायू देणारी , ५ ' देशी ' झाडे लावूया.

  • ओला कचऱ्यावरआपल्या घरात अथवा वसाहतीमध्ये पक्रिया करून , खत निर्माण करूया.

  • विजेचा मर्यादित वापर

या आणि अशा अनेक छोट्या छोट्या उपायांमधून आपण पर्यावरणाचा बिघडलेला ' समतोल ' साधण्याचे काम नक्कीच करू शकतो. आजच्या ( ५ जून ) जागतिक पर्यावरण दिनी , तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून म्हणजेच पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण होणार नाही, असा संकल्प करूया.



Comments


©2024 by AimSolute.

  • Facebook
  • LinkedIn
  • YouTube
bottom of page