कधी मावशीचा वाढदिवस ,
कधी मामा कडून जुने फोटो दाखवत हक्काने झालेलं कौतुक ,
कधी हृदयात कोरलेली दादाची शाळा ,
कधी प्रत्येक उत्स्फूर्त प्रतिक्रियेला मिळालेली तितकीच उस्फुर्त दाद ,
हे सारे अनुभवायला मिळाले
ह्या १२ डिसेंबर, २०२१ ला .....
निमित्त होते ईशा हुबळीकर हिच्या पहिल्यावहिल्या इन्स्टाग्रामवरील अनौपचारिक मुलाखतीचे .
लेखक व माध्यम सल्लागार असलेल्या प्रचेतन पोतदार आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन इन्स्टाग्रामवर आलेल्या अनेक व्यक्तयानंतर देखील मुलाखतीची दिशा भरकटू दिली नाही आणि प्रेक्षकांच्या वतीने विचारलेल्या अनेक प्रश्नांना इशानेही आत्मविश्वासाने उत्तरं दिली.
कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता, मनात संकल्पना स्पष्ट असेल तर ध्येयाकडे जाणारी वाटचाल कशी सुकर होते, हे आज अनेकांना इशाकडून शिकायला मिळाले.
वकिलीचे सुरू असलेले शिक्षण, कंपनी सेक्रेटरी होण्याची निर्धारित केलेली वाटचाल, ढोल पथकात वादन करताना दाखवलेला तेवढाच जोश, अनेक क्षेत्रांत अष्टपैलू म्हणून स्वतःचा ठसा उमटवला, तरीही पाय सदैव जमिनीवर ठेवणे म्हणजे काय ?
हे सर्व तिने कठोर परिश्रम घेऊन कसे साध्य केले. हा प्रवास आज नजरेसमोर उभा राहिला.
हक्काने मैत्री निभावताना, समाजमाध्यमे (Social Media) कशी हाताळावीत, त्यात आपल्या आयुष्याचा खासगीपणा कसा टिकवावा ? अशा इतर अनेक प्रश्नांची कोणताही आडपडदा न ठेवता मिळालेली उत्तरे प्रेक्षकांना पुढेही खूप मार्गदर्शक ठरतील ह्यात शंकाच नाही .
अंकित खत्री ह्या होतकरू कलाकाराचे तिने कौतुक ही केले, प्रेक्षकांना अनेक प्रश्न विचारायला सांगून एक नवीन आत्मविश्वास दिला .
तांत्रिक व्यक्तय अनेक वेळा आला तरीही ,तिची एकाग्रता ढळली नाही, अनेक वेळा तुम्हांला नकारामधून येण्याऱ्या नैराश्यावर कशी मात करावी ह्यावर देखील इशा मनमोकळेपणे व्यक्त झाली
आपल्या माणसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना ,आपल्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्रास देणाऱ्या व्यक्तीला कसे हाताळावे हे तिने तरुण मॉडेल्सना सांगितले
रॅपिड फायर च्या प्रश्नांना आडपडदा न ठेवता आनंद घेत तिने उत्तरं दिली.
एकंदरीत ही मुलाखत मार्गदर्शनपर ठरली व igtv च्या माध्यमातून पुढेही ठरेल ह्यात शंकाच नाही .
ही मुलाखत वेळ काढून पाहण्यासाठी ,इथे क्लिक करा :
भाग १ / ३ : https://www.instagram.com/tv/CXYuxQXom_2/?utm_medium=copy_link
Comments