top of page
Writer's pictureAimSolute Solutionist

बौद्धिक संपदा क्षेत्रातील "अजिंक्यतारा"

" पेटंट ह्या त्याचा स्वार्थ नाही, तर श्वास आहे ,

लोकांचं आयुष्य बदलून टाकण्याचा फक्त त्याला ध्यास आहे "


या ओळींना न्याय देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे बौद्धिक संपदा क्षेत्रातील "अजिंक्यतारा" असणारे , श्री. अजिंक्य कोट्टावर.

इमान आम्हां एकच ठावे ,

घाम गाळुनी काम करावे

मार्ग वेगळा नाही

आम्हां स्वर्ग वेगळा नाही


ह्या अण्णाभाऊ साठे ह्यांच्या या ओळी सत्यात उतरवून एक नवे उदाहरण प्रस्थापित करणाऱ्या अजिंक्य कोट्टावार ह्यांसोबत मुलाखत रंगली होती, Aimsolute प्रस्तुत "विशेष व्यक्ती विशेष मुलाखत" च्या विशेष भागामध्ये.


अजिंक्य कोट्टावार ह्यांचे पेटंटबद्दलचे यश सर्वश्रुत होतेच, पण पडद्यामागची कहाणी ऐकताना खूप गोष्टी नव्याने जाणून घेता आल्या .


कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रोजेक्ट बद्दल पहिल्यांदा भरभरून बोलताना यश ,अपयश व संशोधक वृत्ती कडे पाहायचा दृष्टिकोन हे मुद्दे नव्याने चर्चिले गेले.


पहिल्या पेटंट पासून ते शिक्षण पद्धती व त्यात अपेक्षित असलेले बदल, ज्ञान फौंडेशनची सद्यस्थिती व इतर अनेक प्रश्नांची उत्तरं देत असताना, ३४ पेटंट आणि ४ कॉपीराईट आजमितीला नावावर असणाऱ्या, ह्या व्यक्तीस "अजिंक्यतारा" असे का म्हटले जाते? हे कळले.


मुलाखती मध्ये मातृभाषा, विविध शिक्षण पद्धती हे मुद्दे चर्चेत असताना अजिंक्य कोत्तावार ह्यांची उत्तरं वाखाणण्याजोगी होती. प्रथमच या मंचावर , प्रथमच, अत्यंत गरजेच्या अशा. ऊर्जा क्षेत्रातील संशोधनाबद्दल दिली.


प्रेक्षक ही त्यात सक्रिय सहभागी होते.


सिनोरी खळदकर ,ह्या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या जलतरणपटूने चक्क शास्त्रीय गायनातून सर्वांना आनंद दिला.


त्या वेळी संगीत व त्यासोबतच जोडलेल्या वैज्ञानिक बाबी ह्यावर अजिंक्य सर व सिनोरी मनापासून व्यक्त झाले.


" समस्या जाणून घ्या . त्या संबंधात उपलब्ध असणारे तंत्रज्ञान शोधा. उपलब्ध असणारे तंत्रज्ञान समस्येचे समाधान कशा प्रकारे करू शकते हे पहा. " - अजिंक्य कोट्टावार

इतक्या सहज सोप्या भाषेत संशोधनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दाखविली . त्याचबरोबर, संयमाचे महत्त्वही अधोरेखित केले.


ह्या मुलाखतीचे सूत्रसंचालन प्रचेतन पोतदार ह्यांनी केलं , ह्या मुलाखतीला डॉ. इना सिंग , नील देशपांडे , डॉ. राजू रामेकर , रजनी म्हैसाळकर , अश्विन जंगम ह्यांची विशेष उपस्थिती लाभली होती.


मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात विशेष रॅपिड फायर चा ही त्यांनी प्रेक्षकांसोबत भरभरून आनंद घेतला व आयोजक आणि प्रेक्षकांच्या प्रती कृतज्ञता केली.




९ ऑक्टोबर २०२१ रोजी , AimSolute आणि Positive Thoughts यांच्या सहकार्याने, संपन्न झालेली ही मुलखत, ज्यांना पाहता आली नाही, त्यांनी खालील लिंक वर जरूर क्लिक करा :

भाग १ / २ :


भाग २ / २ :


Bình luận


bottom of page