top of page
Writer's pictureMs. Harshadaa Potadar

"बोधचिन्ह" म्हणजे काय ?

Updated: Mar 6, 2024

व्यक्तीची ' ओळख ' ही त्याच्या नावापासून सुरु होते. उद्योग व्यवसायाच्या बाबतीत पण हे खरे आहे का ?


हो, नक्कीच!


पण, इथे ओळख म्हणून नावाबरोबरच त्या त्या उद्योगाचे , त्या त्या व्यवसायाचे चिन्ह आपल्या लक्षात राहते. कित्येकदा नाव पटकन आठवत नाही. पण, ती एक ठरविक भौमितिक आकृती, एकाच ठराविक ढंगामध्ये असलेली , ठराविक रंगामध्ये रंगविलेली 'ती' आकृती, ते चिन्ह , नावाच्याही आधी , आपल्या साऱ्यांच्याच लक्षात राहते.


आपल्या मनात ठसते.

हो ना !!


थोडक्यात काय तर नावाइतकेच , किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्व या चिन्हाला आहे. ज्याला, कंपनीचे बोधचिन्ह म्हणजे लोगो , असे आपण म्हणतो .


प्र . लोगो ची गरज कोणाकोणाला असते ?

त्या प्रत्येक उद्योगाला , व्यवसायाला स्वतः:चा ' एकमेव ' असा लोगो असणे गरजेचे आहे, ज्यांना स्वात:स्वतः:चे ' एकमेव'' असे नाव आहे. म्हणजेच, लोगो हा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.


प्र . लोगो कसा असावा?

एका शब्दात उत्तर द्यायचे असेल तर - एकमेवद्वितीय.


तुमचे नाव जसे हे फक्त तुमचे असते , नाव उच्चारल्याबरोबर तुमचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते, तसेच लोगोचे देखील आहे. लोगो पाहून तुमच्या कंपनीचे वेगळेपण जाणवले पाहिजे. ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.


लोगो हा तुमची , तुमच्या कंपनीची निर्माण ओळख होण्याचा सगळ्यात पहिला आणि सहजसाध्य मार्ग आहे.


तुमची उत्पादने , वेबसाईट , संपर्क माध्यमे आणि अशा सगळीकडे दिसणारा लोगो हा ग्राहकांना आकर्षित तर करतोच, पण त्याचबरोबर कंपनीची ओळख एका नव्या स्तरावर नेतो.


इतके अनन्य साधारण महत्त्व असणारा लोगो, हे बोधचिन्ह साकार करताना, त्यामागील उद्योजकाचा विचार हा तेवढाच स्पष्ठ , स्वच्छ असला पाहिजे. वेळ घेऊन त्यावर काम केलेच पाहिजे. रंग, आकृती या मागील विचार , सर्वात प्रथम अधोरेखित करणारा लोगो पाहिजे.



Copyright All rights reserved

हर्षदा पोतदार

२०२३











Comments


bottom of page