top of page
Writer's pictureMs. Harshadaa Potadar

भारतीय उद्योगजगताचे संस्थापक - जे. आर. डी. टाटा

भारतीय उद्योगजगताचे संस्थापक, आधारस्तंभ असणारे जे. आर. डी. टाटा.

भारतीय नागरिकांमध्ये उद्योजकतेचे बीज पेरून, योग्य दिशा दाखविण्याचे अतुलनीय आणि अवर्णनीय कार्य त्यानं केले. त्यासाठी आम्ही सर्व भारतीय नागरिक आपले कायम ऋणी आहोत.

जे. आर . डी. टाटा यांनी केवळ एका पेक्षा जास्त उद्योग उभारले असे नाही , तर त्या प्रत्येक उद्योगाला शिस्तीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर सर्वोकृष्ठ बनवले. अनेक उद्योगांना उभे करण्यासाठी मदत केली. देशहिताला प्रथम प्राधान्य देत, या सर्व उद्योगविश्वाला प्रगतीपथावर नेले. भारतीय उद्योग साम्राज्याची आणि त्यातील सामर्थ्याची दाखल साऱ्या जगास घेणे क्रमप्राप्त होते.


परिपूर्णतेसाठी प्रयत्न करत राहिलात , तर तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकाल - जे. आर . डी. टाटा

आज आपण अनेक उद्योग उभे राहताना आणि अवघ्या काही दिवसात बंद होताना पाहतो. टाटा समूहात आज 30 वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि 10 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. हे एकच वाक्य त्यांची दूरदृष्टी, ध्यास, व्यवसायावरही पकड आणि सातत्य सांगण्यास पुरेसे आहे.


"दिव्यत्वाची प्रचिती" देणारे जे. आर. डी एक दृढनिश्चय असलेले पण संयमी, कल्पक पण सदैव दक्ष आणि प्रज्ञावंत पण व्यवहार बुद्धियुक्त असे कर्मयोगी होते.


आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती, भारतरत्न जे.आर.डी.टाटा यांच्याविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात नितांत आदर आणि प्रेम आहे आणि कायम राहील .



सर्व उद्योजकांना, उदयोन्मुख उद्योजकांना, नव्याने सुरुवात करणाऱ्या उद्योजकांना, आणि त्याच बरोबर उद्योजकतेचे स्वप्न मनाशी बाळगून असणाऱ्या, प्रत्येक नागरिकाला उद्योजक दिवसाच्या अनेक शुभेच्छा !!





Comments


bottom of page