top of page

मी पण " उद्योजक "

Writer's picture: Ms. Harshadaa PotadarMs. Harshadaa Potadar

उद्योजक होण्यासाठी मोठ्या औद्योगिक कुटुंबात जन्म घेतला पाहिजे, असे काही नाही. प्रत्येक व्यक्ती ही उद्योजक होऊ शकते. 'उद्योजक म्हणून यशस्वी होऊ शकते.


पहा ना?


सगळ्या मानव प्राण्यांना, अडचणींमधून मार्ग काढण्याची अफाट शक्ती आणि आंतरिक प्रेरणा, ही निर्सगाने बहाल केलेली आहे. रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात , कितीही सर्वसामान्य का असेना (!) , आपण किती गोष्टींवर विजय मिळवत पुढे जात असतो.

कधी विचार केलाय का?


रोजची लोकल किंवा बस पकडण्याची कसरत

स्वत:ची गाडी असेल तर पेट्रोलची चिंता ? आणि रहदारी (म्हणजे ट्रॅफिक हो ) ?

आज आपला पगार होईल ना ? या 'अर्ध्या ' पगारात कसे भागवायचे?


औषधपाणी, (ऑनलाईन ) शाळांची फी, कर्जाचे हफ्ते , गेली दोन वर्षे रंग देण्याची वाट पाहणार 'घर' आणि त्यात पुन्हा नोकरी जाण्याची टांगती तलवार ...


अशा अनेक अतर्क्य आणि अघटित संकटांबरोबर , एकाच वेळी, सामना करणारा हा 'सामान्य' माणूस, हा खरा 'उद्योजक'



भलेही तो, त्याच्या ग्राहकांना , कोणतीही सेवा, पुरवत नसेल, पण एका कुटुंबाची आर्थिक, सामाजिक आणि भावनिक जबबादारी आपल्या दोन्ही खांद्यावर अनेक वर्षे, उत्कृष्ट्पणे आणि निरंतर वाहतो आहे. त्यातून नवीन रस्ते शोधत आहे. त्याचबरोबर स्वतः ला पण खंबीर बनवतो आहे.

अगदी अविरतपणे ...


उद्योजकतेचा अभ्यास करताना, उद्योजक होताना, या उद्योजकतेचे धडे रोजच्या जीवनात प्रत्यक्षात आणताना, प्रेरणास्थान असणाऱ्या या "सामान्य माणसाला" विसरून कसे चालेल ?

Comments


bottom of page