समृद्धता म्हणजे काय ?
या प्रश्नाचे उत्तर एक शब्दात द्यायचे असेल तर ते उत्तर आहे : मराठी.
अमोघ साहित्याची समृद्धता आणि अलौकिक इतिहासाचा वारसा असणारी आणि तो जपणारी भाषा म्हणजे आपली मायबोली मराठी.
महाराष्ष्ट्रात बोलली जाणारी मराठी भाषा मात्र महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित नाही. तर या मायमराठीचे पाईक हे गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ या राज्यांत आणि दमण, दीव, दादरा नगर हवेली या संघराज्यांमध्येदेखील आहेत. त्याचबरोबर, फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही बोलली जाते.
अशा वैभवशाली मातृभाषेचा गौरव दिन आज , २७ फेब्रुवारी रोजी, आपण साजरा करीत आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस , जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र आणि गोव्याची अधिकृत भाषा.
मराठी भारतातल्या अधिकृत २२ भाषांपैकी एक आहे.
जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी १५ वी भाषा आहे. तर भारतातली तिसरी भाषा आहे.
दीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा.
ज्ञानकोश, विश्वकोश, शब्दकोश, वाङ्मयकोश, तत्त्वज्ञानकोश , इ. अनेक प्रकारचे कोश हे मराठी भाषेचे वैशिष्टय आहे. काठ, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णने, वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक , इ. या सारखे साहित्य प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ आणि केवळ मराठी भाषेतच आढळतात.
मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. या दोन वाक्यातून आजही असलेले मराठीचे वैभव आणि तिची व्याप्ती याची कल्पना करू शकतो.
मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असेलही.. नवीन पिढीपर्यंत मराठी भाषा पोहोचविण्याची जबाबदारी ही तुम्हा आम्हा मराठी भाषा पाइकांची आहे. बाकी काहीप्रयत्न होत आहेत आणि होत राहतीलच... पण, मराठी भाषेत बोलण्याची आणि लिहिण्याण्याची पहिली जबाबदारी, कर्तव्य आणि आपल्या सर्वाचा जन्मसिद्ध हक्क देखील आहे.
आपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या माय मराठीच्या सर्व भक्तांना ' मराठी भाषा गौरव दिनाच्या' अनेक शुभेच्छा ...
मराठी बोलूया
मराठीत लिहूया
मराठी वाढवूया
मराठी भाषा प्रेमी ,
© हर्षदा पोतदार
९१६८५५३९७२
खूपच छान लेख.