बहुचर्चित मिस अँड मिस्टर मेक इंडिया पर्व दुसरे हे भारतातील सौंदर्य स्पर्धांमधील एक प्रतिष्ठित नाव म्हणून पुढे येत आहे.
भारत विभूषण पुरस्कार, वर्ल्डस फॅशन आयकॉन, आणि जगातील सर्वात कमी वयाच्या फॅशन कोच चा बहुमान पटकावलेल्या मुकुल फाटे यांच्याकडून याचे आयोजन करण्यात येत आहे. सौंदर्य आणि गुणांचा येथे होईल गौरव!
मुकुल हे तसे चर्चेतील नाव. आशियातील सर्वात हँडसम चेहरा २०२४ हे अभिधान पटकावणे किंवा अभिनयातील बारकावे शिकवणारे लीला हे पुस्तक लिहिणे, यामुळे सर्वांना ओळखीचा झालेला मुकुल फॅशन क्षेत्रातील एक मोठे प्रस्थ आहे. त्याच्या आयोजनामुळे या स्पर्धेविषयी सर्वत्र चर्चेचे आणि उत्साहाचे वातावरण आहे
याआधीही ही स्पर्धा प्रचंड यशस्वी ठरली. गेल्या वर्षीचा विजेता राहिल सिद्दिकी आणि विजेती देविका नयन या दोघांनीही आपली कारकीर्द मोठ्या दिमाखात सुरू केली आहे.
मिस अँड मिस्टर मेक इंडिया (MEQ India) ही केवळ एक सौंदर्य स्पर्धा नाही, तर ती व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा मंच आहे. या स्पर्धेत देशभरातील तरुण-तरुणींना आपले गुण दाखवण्याची संधी मिळते. MEQ India स्पर्धेची खासियत म्हणजे इथे केवळ बाह्य सौंदर्यच नाही, तर अंतर्गत गुण आणि विचारांचीही परीक्षा घेतली जाते. मुकुल फाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्पर्धकांना फॅशन, अभिनय, आणि नेतृत्व गुणांवर सखोल मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे ते केवळ रॅम्पवरच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सज्ज होतात.
Comments