top of page
Writer's pictureMs. Harshadaa Potadar

यश म्हणजे नक्की काय असतं ?

Updated: Jun 11, 2021

यश म्हणजे काय ?

ध्येयपूर्ती म्हणजे यश का ?


यश कशाला म्हणायचे?

संम्पत्ती, कार, बंगला, सहा आकडी पगार म्हणजे यश का?

की अजून काही ?


उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. - अर्ल नाईटिंगेल

यामध्ये, ध्येय आणि त्याकडे होणारी वाटचाल , या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या . त्याचबरोबर, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ध्येय हे " उचित " असले पहिले. सोप्या शब्दात सांगायचे तर , एखाद्या व्यक्तीला यश तेव्हा मिळेल, जेव्हा ती व्यक्ती त्याने ठरवलेल्या उचित ध्येयाकडे चालत राहील. हो, ध्येय सुद्धा बदलत राहणार . बरेचसे उद्योजक हे आपल्या क्षमतेचा आवाका लक्षात न घेता, ' ध्येय ' ठरवतात. कदाचित, त्यामुळे सुद्धा अपयशाकडे खेचले जातात.


जेवढे तुमचे प्रॉडक्ट किंवा सेवा ही अद्वितीय ( unique ) आहे, तितकेच तुमचे ' ध्येय ' ही असले पाहिजे. एक उद्योजक म्हणून, एक व्यक्ती म्हणून , तुमची वेगवेगळी ध्येये , उद्दिष्ये असणे , स्वाभाविक असणे. पण,यामध्ये होणारी गल्लत , तुम्हाला यशापासून दोन पाऊले दूर ठेवू शकते.




एकाच प्रकारच्या सेवा देणाऱ्या दोन संस्थांचे ध्येय हे असणे गरजेचे नाही. प्रत्येक संस्थेची जडणघडण, उद्योजकाचे अंगभूत कौशल्य, कामावरील निष्ठा , तेथे काम करण्याऱ्या व्यक्तींचे विचार, भौगोलिक , राजकीय आणि मुख्यत्वे आर्थिक परिस्थिती लक्षात घेणे, गरजेचे आहे. आपल्या सगळ्यात जवळच्या स्पर्धकांचे ध्येय हे आपले ध्येय कधीच नाही होऊ शकत. आपले ध्येय काय असावे हे ठरविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, हे मात्र नक्की.


अनेकवेळा आपण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविरत परिश्रम करून, एक एक पायरी चढत राहतो. यात स्वतः: ला किंवा आपल्या सहकार्यांना , आपल्या सांघिक प्रयत्नांना ' दाद' देण्यास विसरतो. आपणच आपल्या किंवा सहकाऱ्यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप , आपले उद्दिष्ट आवाक्यात आणण्यासाठी अत्यंत गरजेची असते. म्हणूनच , प्रत्येक छोटी छोटी गोष्ट , जी आपल्या ध्येयाच्या दिशेने नेत आहे, नेणार आहे, त्या सर्व गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत . उद्योजक म्हणून विकसित होताना या गोष्टी ओळखत येणे, महत्त्वाचे आहे.


यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू. यशापयशाच्या हिंदोळ्यावर उद्योजक सतत झुलत असतो. कालावधी कमी जास्त होतो. मात्र, यातून सुटका कोणाचीच होत नाही. एका उद्योजकाला दोन्ही परिस्थितींचा सामना करावाच लागतो. यश आल्यावर हुरळून न जाता आणि अपयश आल्यावर न डगमगता , जो आपला उद्योग उभा करतो , तो खरा ' यशस्वी उद्योजक '



Comentarios


bottom of page