उद्योजकतेचे चालतेबोलते व्यासपीठ - रतन टाटा
- Ms. Harshadaa Potadar
- Dec 28, 2021
- 2 min read
Updated: Jan 6, 2022
" रतन टाटा ' - भारतीय उद्योगविश्वाची सुरुवात ज्या नावापासून सुरु होते, असे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व .
सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची गरज लक्षात घेऊन, त्यांच्या दारात, त्यांच्या स्वतः च्या मालकाची चारचाकी गाडी उभी करण्याचे स्वप्न दाखविणारे आणि केवळ स्वप्न दाखवून न थांबता , ते पूर्ण करणारे असे 'दूरदृष्टी' रतन टाटा.

वयाच्या २४ व्या वर्षांपासून . टाटा स्टीलच्या एका दुकानात , केलेली सुरुवात ते टाटा समूहाचे अध्यक्ष... हा जीवनप्रवास थक्क करणारा...
अनेक खाचखळग्यांची भरलेला , अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना करत , आणि त्याचबरोबर सर्वांना सोबत घेऊन पुढे जात , एक उद्योग समूह आणि तसेच एक व्यक्तिमत्त्व म्हणून परिपकव होत जाणारा....
एका प्रतितयश उद्योग समूहाची धुरा सांभाळत असताना देखील माणसाचे माणूसपण जपणारा आणि जाणणारा ...
ते फक्त एक उद्योजकच नसून ते एक चांगले पायलट सुद्धा आहेत. आणि प्लेन उडवणे हि त्यांची एक आवडही आहे. तसेच त्यांना पाळीव प्राणीही पाळायला आवडतात. सोबतच त्या प्राण्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणेही त्यांना आवडते.
आपल्याला जे काम करायला आवडते ते कार्य आपण केले पाहिजे आणि तेच काम वेळेवर केले पाहिजे.
– रतन टाटा
भारतीय उद्योजकांनी " टाटा; या नावाकडे, फक्त ब्रँड म्हणून न पाहता, उद्योजकतेचे चालतेबोलते व्यासपीठ म्हणून पाहायला हवे.

जिद्द , चिकाटी, चौफेर फिरणारी दूरदृष्टी, अविश्रांत कष्ट करण्याची तयारी, सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची अनोखी ' वृत्ती ' आणि त्यांच्यावर दाखविलेला डोळस विश्वास, वेळेचे उत्तम नियोजन करण्याचे कौशल्य, देशावर निस्सीम प्रेम आणि आदर , इ . अनेक अंगभूत कौशल्याचा योग्य वापर कुठे ? कसा ? आणि केव्हा करायचा ? हे शिकण्यासाठी सर्व उद्योजकांची ,रतन टाटा यांचे चरित्र वाचावयास हवे.

रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला नवी " दिशा " आणि " उंची " दिली. त्याचबरोबर फिलांथ्रोपिस्ट (Philanthropist) म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना टाटांनी मदत केली आहे. व्यवसाय आणि परोपकाराच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो, वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !!!
Comments