हो, भाषेलाही आवाज असतो.
कोणत्याही भाषेचे सौन्दर्य , हे त्यातील शब्द - भांडारावरच नव्हे, तर शब्दोच्चारावर सुद्धा अवलंबून असते. गीर्वाणवाणी असणाऱ्या 'संस्कृत' पासून, सगळ्या भाषा विकसित गेल्या. संस्कृत ही सर्व भाषांची जननी. आणि संस्कृत मध्ये असणारे शब्दोच्चारांचे महत्त्व हे सगळ्या भाषेत देखील आहे.
आणि संस्कृत मध्ये असणारे शब्दोच्चारांचे महत्त्व हे सगळ्या भाषेत देखील आहे. मात्र, कित्येकदा आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये हे शब्द किंवा ही अक्षरे वापरताना, त्यांचे भाषांतर करताना, त्यांची ओळख ( मग ती शाब्दिक असो अथवा आवाजातील असो ... ) ती कुठेतरी हरवून जाते.
नाही का?
हाच किंवा असाच विचार घेऊन संशोधन कार्यांत उतरलेले डॉ. राजू रामेकर. स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत, भारतीय भाषांना ओळख देण्यासाठी, त्यांनी केलेल्या आणि करत असलेल्या कार्याला, आम्हा सर्वांकडून खूप खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा .
' ळ ' म्हणजे नक्की काय ?
ह्या अक्षरामुळे कित्येक भाषांचे सौंदर्य टिकून राहते , हे आज आम्हांला नव्याने अनुभवायला मिळाले निमित्त होतो ते डॉ. रामेकर ह्यांच्या सोबत, इंस्टाग्राम वर झालेल्या, " विशेष व्यक्ती, विशेष मुलाखत" या उपक्रमाअंतर्गत झालेल्या मुलाखतीचे .....
मूळचे यवतमाळचे असणारे आणि सध्याआदीलाबाद येथे स्थानिक होऊन ही मराठी भाषेशी नाळ जोडून ठेवणारे डॉ. साहेब, यांनी नुकताच ळ हा इंग्रजी भाषेत ही आहे तसाच बोलला जावा, यासाठी सतत पाठपुरावा करत आता केंद्र सरकार कडून ह्या विषयी कॉपीराईट देखील मिळवला आता ही गोष्ट सर्वत्र पोहचावी, ह्यासाठी त्यांचे प्रयत्न किती सातत्यपूर्ण आहेत हे दिसले.
त्यांचे दोन्ही चिरंजीव स्मिराज व समृद्ध हे देखील मुलाखती मध्ये सहभागी झाले , मराठी फूड बाइट्स ह्या स्वतःच्या यू ट्यूब चॅनेल बद्दल छोटा समृद्ध भरभरून बोलला.
एक डॉक्टर ते एक भाषेसाठी योगदान देणारे व्यक्तिमत्त्व हा प्रवास प्रेक्षकांना भावला , अनेक अमराठी प्रेक्षकांनी देखील हया मुलाखती ला उपस्थिती लावली होती.
ह्या मुलाखती चे सूत्रसंचालन प्रचेतन पोतदार ह्यांनी उस्फुर्त पणे केले अधुमधून तेलुगू व तमिळ भाषेच्या वाक्यामुळे देखील मुलाखती मध्ये रंगत टिकून राहिली.
ज्यांना ही मुलाखत परत अनुभवायची आहे त्यांनी येथे क्लिक करा : -
भाग १ / २:
भाग २ / २:
'ळ' बद्दल आलेली मरगळ , डॉ. रामेकरांच्या प्रयत्नांमुळे निघून जाईल. अशी आशा नक्की करूया....
Comments