उद्योग सुरु करण्यासाठी वयाची अट असते का? वयाचा आणि उद्योग सुरु करण्याचा संबंध आहे का ?

कोणत्याही वयात उद्योग सुरू करायला हरकत तशी काहीच नाही. उद्योजकतेची आपला पाया किती पक्का आहे ?
भांडवलाच्या दृष्टीने आपले पाय किती 'पाण्यात' आहेत ?
'नोकरी' सोडून उद्योग सुरू करत्तय काय ?
मग रोजच्या खर्चाची 'तजवीज' केली आहे का?
सगळ्यात महत्त्वाचे , उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे धाडस , धडाडी आपल्याकडे आहे ना ?
कारण, भांडवल, सहकारी , इ. तुम्ही सर्व जमा करू शकता , त्याची जमवाजमव करू शकता, योग्य वेळी मिळवू शकता.
' जोखीम ' घेण्याची तयारी आणि त्याबरोबर येणारी जबाबदारी ही फक्त आणि फक्त तुम्हालाच घ्यायची आहे आणि पेलायची सुद्धा आहे. तेवढे सक्षम खांदे आहेत का? नाहीतर जबाबदारीचे जोखड होतील आणि त्याचे पर्यवसान नको त्या वाटेवर होऊ शकते.
पदवीनंतर उद्योग सुरू करण्याकडे आजच्या तरुणांचा जास्त कल आहे. उपलब्ध असणाऱ्या संधी आणि पोषक वातावरण , २० ते ३० वयोगटातल्या तरुणांना नवीन उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देत आहे. म्हणुच, सर्वाधिक स्टार्ट अप या वयोगटातील तरुण तरुणांनी सुरू केलेले आहेत.

नोकरीचा अनुभव घ्यावा की नाही ?
एकाच नाण्याला एकापेक्षा जास्त बाजू असतात ना, तशा या प्रश्नाला देखील अनेक बाजू आहेत. प्रत्येकाचे या बद्दल प्रयेलाचे वेगवेगळे मत असणे, खूप स्वाभाविक आहे. नोकरीतून मिळणारा पैसा तुम्हाला एक जीवनशैली बहाल करतो. नोकरीमध्ये मिळणारा अनुभवला मात्र तोड नाही. अनुभव कोणताही, कसाही आणि कुठेही घेतला तरी तरी चालेल .
आणि तुमचे घ्येय जर पक्के असेल तर उबदार जीवनशैली तुम्हाला भुरळ पाडू शकत आहे, हे वास्तव आहे. अशी अनेक उदाहरणे आपल्या नजरेसमोर आहेत.
उद्योग तुम्ही कोणत्याही वयात सुरू करू शकता . प्रत्येक वयोगट चे फायदे तोटे आहेत. पण, यातील समान धागा शोधायचा झाला तर तुम्ही तुम्हाला उद्योजक किंवा उद्योजिका म्हणून प्रस्थापित करत असताना थांबायचा पर्याय तुमच्याकडे नसतो. " थांबला तो संपला " हा उद्योग जगताचा मंत्र आहे.
थोडक्यात काय, तर वयाचे बंधन हे तुमच्या कल्पनेत फक्त अस्तिवात आहे. प्रत्यक्षात , अगदी निवृत्तीनंतरही यशस्वी उद्योग सुरू करू शकता. धाडस , कल्पना आणि व्यवस्थापन याचा योग्य मेळ घालता येणे, महत्त्वाचे. जेव्हा हा मेळ घळणे जमायला लागेल, तेच वय उद्योग सुरू करण्याचे योग्य वय आहे , नाही का ?
Comments