"उद्योजक" आपल्या उद्योगाचा कुटुंबप्रमुखचच असतो. कुटुंब लहान असो वा मोठे - त्याच्या कुटुंबप्रमुखाला कधीतरी "वाद" हे हाताळावेच लागतात. अनेक वेळा , अपेक्षित आणि बऱ्याच वेळा अनपेक्षित ' वाद' तुमच्या पुढ्यात 'दत्त' म्हणून उभे असतात . तुम्हीही असे प्रसंग अनेक वेळा बघितले असतील ना? किंवा त्या प्रसंगातून मार्ग सुद्धा काढला असेल ?
उद्योग धंदा सुरु ठेवण्यासाठी, चालू राहण्यासाठी , रोज अनेक लोकांशी संपर्क येतो . सगळ्याच व्यक्ती आपल्याच सारखा विचार करत असतील असे नाही. कित्येक वेळा , प्रत्येक व्यक्तीची महत्त्वकांक्षा , ही सुद्धा वादाकडे जाण्यासाठी एक विषय होऊ शकतो. अनेक संस्कृती जपणारी माणसं, त्याच्या मनात असणाऱ्या अनेक वेगवेगळा समजुती, शिक्षण आणि अनुभवातील प्रचंड तफावत, अशा अनेक गोष्टी दोन व्यक्तींमधील मतभेद वाढविण्याचे काम करू शकतात.
या सगळ्या गोष्टींचे भान राखत, उद्योजकाला मात्र , हे सर्व मतभेद , जर उद्योगावर , प्रत्यक्ष किंवा अ-प्रत्यक्षपणे परिणाम करत असतील, ते लवकरात लवकर हाताळावे लागतात. अशा वेळी, उद्योगाचा मालक , ही भूमिका , जराशी मागे ठेवून, मित्र म्हणून त्यांच्यामध्ये मिसळून, हे वाद किंवा त्या अनुषंगाने होणारे वाद हा, तिथेच संपवता आले, तर अति उत्तम.
कौशल्य
ही प्रक्रिया प्रत्येक वेळी एवढी सुकर असेल , असे नाही. प्रत्येक वेळी प्रश्न वेगळे असू शकतात आणि त्यामुळेच, प्रत्येक वेळी हे प्रश्न मी हाताळताना , उद्योजकाने , परिस्थिती सुसंगत विचार करून, हे वाद हाताळायला हवेत. वाद हाताळण्याचे कौशल्य हे देखीळ अत्यावश्यक कौशल्य आहे , फक्त उद्योग चालविणाऱ्या व्यक्तीसाठी नाही तर प्रत्येकासाठी ... आजकाल कमी झालेला आणि होत जाणार ' सामुदायिक संयम ' खूप जास्त गरजेचं आहे.
नुकताच अनुभव घातलेल्या ' लॉकडाऊन सकारात्मकता ' सारख्या , अभूतपूर्व परिस्थितीतून , आपण संयम आणि सकारात्मता , या दोन प्रमुख मूल्यांच्या बळावर बाहेर पडू शकलो किंवा अजून उभे आहोत. वाद हाताळण्यासाठी साठी , संयम आणि सकारात्मकता ही दोन्ही मूल्ये, आणि त्याचबरोबर आपल्याला काय हवे आहे ? याचे सजगपणे असलेले भान, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद , योग्यप्रकारे हाताळण्यासाठी आवश्यक आहे.
रोज भेटणाऱ्या अशा वादाच्या प्रसंगांना, जो संवादाची वाट दाखवतो, तोच उद्योजकतेची नवनवीन शिखरे आत्मसात करू शकतो.
Comments