आज शिवजयंती
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष । या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
– समर्थ रामदासस्वामी
प्रौढ प्रताप पुरंदर . . .
क्षत्रीय कुलावंतस् . . .
सिंहासनाधिश्वर . . . .
महाराजाधिराज . . . .
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
Comentarios