top of page
Writer's pictureMs. Harshadaa Potadar

सातत्य आणि उद्योजकता


सातत्य म्हणजे सतत प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा .


सातत्य म्हणजे कोणत्याही परिस्थिती मध्ये न डगमगता , न अडखळता , न थांबता आपले काम करत राहणे. उद्योजकीय प्रवासात सगळ्यात महत्त्वाचे जर काही असेल तर प्रयत्नांमधील सातत्य .


सातत्य मग ते विपणन करण्यात असो;

जाहिरात करण्यात असो;

नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यात असो;

स्वतः साठी वेळ देण्यात असो;

व्यायाम करण्यात असो;

वाचण्यात असो अथवा

विचारांमधून सृजनात्मक काही घडणे असो... थोडक्यात काय तर सातत्य हवे.


उद्योजक हा नवनवीन योजनांचा उदय करणारा असतो. भविष्याला आकार देण्याचे काम उद्योजक करतात. ही जबाबदारी व्यवस्थितपणे पेलण्यासाठी उद्योजकाची स्वतः:ची विचारांची बैठक 'सकारात्मक' असायला हवी. या सकारात्मकतेला प्रयत्नांची जोड असेल तर तुम्ही अर्धी लढाई जिंकीलच म्हणून समजा .



" सातत्य आणि उद्योजकता " याचे बोलके उदाहरण म्हणजे संशोधक एडिसन . थॉमस अल्वा एडिसन.


त्यांच्या नावे विश्वातील सर्वाधिक १०९३ शोधांच्या नोंदी आहेत. हे एकच वाक्य " सातत्य म्हणजे काय ? " हे सांगण्यासाठी आणि समजन्यासाठी पुरेसे आहे.


अविश्रांतपणे मेहनत करून, अनेक अयशस्वी प्रयत्नांनामधून शिकत शिकत विजेचा दिवा तयार झाला . वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांच्या या कारखान्याला आग लागली होती. लक्षावधी डॉलर्सची मालमत्ता जळून खाक झाली. त्यावेळी ह्या जिद्दी संशोधकाच्या तोंडून,

" ‘विनाशसुध्दा मोठा मौल्यवान असतो.’ त्यात आपल्या सर्व चुका भस्मसात होतात. देवाचे आभार मानले पाहिजे. कारण, आता आपण नव्याने सुरुवात करू शकू.’’

केवढा प्रचंड सकारातमक दृष्टीकोन !

किती दुर्दम्य इच्छाशक्ती !!

या घटनेनंतर केवळ तीन आठवड्यातच त्यांनी ग्रामोफोनचा शोध लावला. आणि त्याचे यशस्वी उत्पादन सुरु केले.

याला म्हणतात सातत्य


उद्योजकांसाठी ऑक्सिजन म्हणजे काय?

तर सातत्य .


उद्योजक बनताना अनेक अडचणी येतील. कठीण आणि अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागेल. परंतु, आपल्या प्रयत्नात पाण्याच्या प्रवाहासारखे सातत्य असेल तर "दगडासारखी" कठीण परिस्थिती आपल्या पुढे टिकाव धरू शकणार नाही. तिच्यावर आपण यशस्वीपणे मात करून पुढील वाटचाल करू शकू .


आपल्या सातत्यपूर्ण उद्योजकीय वाटचालीस अनेक शुभेच्छा







Comentários


bottom of page