top of page
Writer's pictureAimSolute Solutionist

"संवाद - स्वतःचा स्वतःशी"

स्वतः साठी वेळ देताय ना ?


कुठल्याही नोकरीमध्ये , व्ययसायामध्ये किंवा अन्य कुठेही स्वतः ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना अथवा स्वतःची ओळख निर्माण करत असताना , रोजच्या धामधुमीच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः साठी वेळ देता का ?

किती वेळ देता?

काय करता तेव्हा?


अनेक ठिकाणी व्याख्यान देताना या प्रश्नावर ज्या पहिल्या प्रतिक्रिया येतात त्या साधारण अशा असतात : -


" अहो ताई, आम्ही असे प्रश्न पहिल्यांदाच ऐकत आहोत? "


" म्हणजे काय ? "


" असं कास? "


" असं काही असत का? "

?


एक व्यक्ती दररोज अनेक नवनवीन माणसांना , समस्यांना आपण न चुकता असतो आणि यालाच जीवाचं म्हणतात . या रस्त्यावर चालत असताना आपली दिशा कोणती आहे ? हे लक्षात असायला हवे, हे समजायला हवे. कितीतरी समस्यांवर उत्तर सहज मिळेल आपल्याला...


पण,सध्या काय होत आहे माहिती आहे का?

हो, संवाद हरवला आहे. . .


जो संवाद होत आहे त्याची गुणवत्ता तपासण्याची वेळ आली आहे. नवीन पिढी आणि नवीन उपलब्ध असणारी अनेकविध साधने याला निश्चितच जबाबदार नाहीयेत. एक महत्त्वाची भूमिका त्यांची आहे आणि ती सकारात्मक पद्धतीने वापरण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.


आणि ज्या संवादाबद्दल मी बोलत आहे ना त्यासाठी कुठल्याही साधनांची, कुठल्याही बाहेरील वस्तूची गरज नाही .


हा संवाद स्वतः चा स्वतः शी व्हायला हवा ...


अगदी ठरवून..


वेळ मिळेल तेव्हा ...


दिवसातील एक वेळ ठरवून घेतली फारच उत्तम...


विचार करण्याची शक्ती वाढविण्यासाठी स्वसंवाद मदत करतो. कोणतेही काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित होणे गरजेचे असते. स्वसंवादामुळे नको असलेले विचार , शंका बऱ्याचशा प्रमाणात कमी होऊन ' मन वढाय वढाय " अशी अवस्था प्रत्येक वेळी होत नाही.


सर्जनशीलता, कल्पनेतील / संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी लागणारे नियोजन


ध्यान , मनन , चिंतन हे शब्द तुम्ही नक्कीच ऐकले असतील ? स्वसंवादाची पुढची पायरी म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता. ध्यान , मनन , चिंतन हे शब्द तुम्ही नक्कीच ऐकले असतील ? स्वसंवादाची पुढची पायरी म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता.


सर्जनशीलता, कल्पनेतील / संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी लागणारे नियोजन .

नियोजन उत्तम प्रकारे होण्यासाठी गरजेची ती विचारांची सुयोग्य दिशा .

त्यासाठी नितांत गरजेची आहे एकाग्रगता . ध्येयाकडे जाण्यासाठी लागणारी एकाग्रता आणि ध्यास यावर काम कसे करायचे ?

हे ठरविण्यासाठी स्व संवादाला पर्याय नाही. मार्गदर्शन, सल्ले , चर्चा यातून नेमके हवे ते शोधण्याचा चष्मा म्हणजे स्वसंवाद. तो नाही घातला तर सारे अस्पष्ट आणि धूसर दिसणार. नाही का?


अन सर्वात महत्त्वाचं स्वसंवाद हा सकारात्मकच हवा. वरील सर्व फायदे मिळविण्यासाठी स्कारात्मतेच्या सुपीक मातीत येणारा स्वसंवादाचा वेल , कोण्याही प्रकारच्या वादळामध्ये , उभे राहण्याचे सामर्थ्य देतो.


स्वत: शी होणाऱ्या संवादाचा महिमा या एका लेखात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न कसा वाटला ? हे नक्की कळवा .


- हर्षदा पोतदार

Comments


bottom of page