मोडी लिपी म्हणजे काय ?
आपल्या भाषेपुढे तिचे अस्तित्व किंवा योगदान काय ?
काय काय दडले आहे ? ह्या मोडी लिपी मधील इतिहासात ?
असे अनेक प्रश्न मनात घेऊन आलेल्या प्रेक्षकांना, आजची ही मुलाखत म्हणजे आनंदाची पर्वणीच ....
निमित्त होते AimSolute प्रस्तुत , ' विशेष व्यक्ती विशेष मुलाखत ' ह्या कार्यक्रमाचे आणि समोर होते पुणे येथील इतिहास संशोधक व मोडी लिपीचे अभ्यासक श्री. योगेंद्र उर्फ राज मेमाणे .
प्रेक्षकांना येतानाच आपलेसे करत राज मेमाणे ह्यांनी मुलाखती मध्ये रंगत निर्माण केली .
मोडी लिपीचा उगम स्थान , मराठीची रनिंग लिपी म्हणून सतत होत असणारा उल्लेख ह्यावरून ते अगदी भरभरून बोलले.
पेशवेकालीन जेजुरी ,पेशवेकालीन पंढरपूर ह्या पुस्तकांच्या प्रवासादरम्यान आलेले अनेक अनुभव व हस्तगत केलेले दस्तऐवज त्या गोष्टींची शहानिशा आणि संशोधन ह्यातून एक नवा आलेख सर्वांसमोर उलगडत गेला .
सदाशिवराव भाऊंचा शिक्का सर्वप्रथम लोकांपुढे प्रकाशित करताना त्यासाठी कोणकोणत्या निकषांवर व कसोटीवर ते संशोधन सत्य असल्याचे सिद्ध केले हे देखील विस्तृत स्वरूपात सांगितले.
पहिल्या सत्राचा शेवटी त्यांनी - मला सांगा , सुख म्हणजे नक्की काय असतं ? हे गाणं देखील आनंदाने गुणगुणले.
ह्यानंतर आला तो ह्या मुलाखतीचा परमोच्च बिंदू ज्याची सर्वजण डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत होते , आणि श्री. राज मेमाणे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा एक कौलनामा म्हणजे आश्वासन पत्र प्रेक्षकांना दाखवले तसेच त्या पत्राशी असलेल्या जेजुरीच्या ऐतिहासिक घटनेचं ही विस्तृत विश्लेषण केलं .
कदाचित आपल्या पैकी अनेकांना ते भाग १ चा व्हिडीओ पाहून पहिल्यांदा च कळेल -
प्रथम सत्रानंतर दुसरं सत्र तांत्रिक अडचणी मुळे काहीसे उशिरा सुरू झाले पण प्रेक्षकांच्या उत्साहात अजिबात फरक पडला नाही .त्यांचे प्रश्न व प्रतिसाद उलट वाढतच गेला.
एका प्रश्नाला उत्तर देताना राज मेमाणे ह्यांनी अक्कलकोट संस्थानातील अनेक कागदपत्रे जी मोडी लिपीमध्ये उपलब्ध आहेत त्याविषयी सांगितले . तुरी च्या डाळी चा उपयोग चांदी ची भांडी स्वच्छ करण्यासाठी होऊ शकतो , तोफेला सर्दी होते म्हणजे काय ? हे त्या नोंदीच्या आधारे आज सर्वांना कळले .
मोडी लिपी मध्ये किमान स्वतःचे नाव आणि सही आली , तरी ते भाषा टिकवण्यासाठी फार महत्त्वाचे योगदान असेल असेही ते म्हणाले.
.
इतिहास संशोधक बनायचे असेल तर जात, धर्म ,व इतर अनेक आडपडदे दूर करून मगच त्यात पडणे योग्य त्याशिवाय आपल्याकडून असे निष्पक्ष संशोधन होणे नाही हे राज मेमाणे ह्यांनी आवर्जून नमूद केली
मुलाखतीचा पुरेपूर आनंद घेतला हे सांगत असताना त्यांनी मुलाखतकार प्रचेतन आणि मुलाखतीचे आयोजन केल्याबद्दल हर्षदा पोतदार ह्यांचे विशेष आभार मानले
येत्या काही दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे प्रशासन ह्या विषयावर लवकरच भेटूया असे सांगत सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला
ज्यांना ही मुलाखत वेळेअभावी पाहता आली त्यांनी नक्कीच खालील लिंक वर जावून ही मुलाखत नक्की पाहावी. कारण सदैव स्मरणात ठेवण्यासारखी अप्रतिम ठेव आहे ही मुलाखत ..... .
भाग १ / २ :
https://www.instagram.com/tv/CWQnG-yoKbv/?utm_medium=copy_link
भाग २ / २ :
https://www.instagram.com/tv/CWQ0KeJowUP/?utm_medium=copy_link
तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे प्रश्न , नक्की कळवा ... कंमेंट्स द्वारे अथवा aimsolute@gmail.com येथे पाठवा ...
Comments