साहसे श्री: प्रतिवसति
- Ms. Harshadaa Potadar
- Nov 23, 2021
- 1 min read
Updated: Feb 6, 2023
उद्योगजगतामध्ये, उद्योजक आणि धाडस हे काहीसे समानार्थी शब्द आहेत. धाडस असल्याशिवाय धंदा करता येत नाही.
आजच्या यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आलेल्या सर्व उद्योजकांची कहाणी ही खरी तर त्यांच्या धाडसाची, त्या त्या वेळी दाखविलेल्या साहसाची, कहाणी आहे.
धाडस असल्याशिवाय धंदा करता येत नाही. सक्षम माणसांशी मैत्री करणे उद्योगासाठी आवश्यक असते.

ते पुढे म्हणाले की, ‘आमची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची होती. शाळेत असताना मी घरोघरी वर्तमानपत्रे टाकायचो. कमवून शिकण्याची आणि शिक्षण घेण्यासाठी परिश्रम करण्याची सवय यातून लागली. उद्योजगतेचे बीज त्याचवेळी रोवले गेले. नंतर पनवेलमध्ये मी वारावर शिक्षण घेतले. पुढे शिक्षणासाठी मुंबईत असताना नोकरी करून शिकत होतो. पण नोकरदार न बनता व्यावसायिक बनायचे असे मी मनोमन ठरवले होते. त्यातूनच कोहिनूर कोचिंग क्लासेस सुरू केले. कौशल्य विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्युट सुरू केली, ज्याच्या आज ७६ शाखा आहेत. हॉटेल इण्डस्ट्री, ऊर्जानिर्मिती, हॉस्पिटल्स या क्षेत्रातही आम्ही काम सुरू केले. सध्या चेन्नईत फाइव्ह स्टार तर दादरमध्ये सेव्हन स्टार हॉटेल उभारणीचे काम चालू आहे.
ऐकताना हे सोपे वाटत असले तरी त्यादरम्यान अनेक अडचणींवर मात केली. माझ्या मोठ्या भावाने माझ्यात उद्योगाचे स्पिरिट जागवले. माझ्यासारखा गरीब माणूस एवढे करू शकतो तर आपण का नाही, असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.’
यशस्वी उद्योजक होण्यासाठी तरुणांनी काय करावे याबद्दल मार्गदर्शन करताना ते म्हणाले,
‘तरुणांनी पंचविशीपर्यंत अभ्यास आणि वाचन केले पाहिजे. शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल तर काम करून ते पूर्ण करावे. तरुणांनी उद्योगात आले पाहिजे. उद्योग करायला पैसा लागत नाही. आजूबाजूला भरपूर पैसा आहे जो आपल्याकडे आणता आला पाहिजे. कर्ज घेतले पाहिजे.’
सुरेश हावरे हे यशस्वी उद्योजक असून ‘धंदा कसा करावा’ या आपल्या पुस्तकामधल्या दहा यशस्वी उद्योजकांमध्ये त्यांचा समावेश केल्याची माहिती मनोहर जोशी यांनी दिली.
प्रत्येकाने स्वतःच्या क्षमता विस्तारल्या पाहिजेत. दुसरे नाही, तर आपणच स्वतःला छोटे करतो, हे मॅनेजमेण्टचे सूत्र हावरे यांनी शोमध्ये मांडले.
Comments