top of page
Writer's pictureAimSolute Solutionist

सिनोरी - जलतरणपटू आणि बरेच काही ...

आजची मुलाखत खरंच विशेष होती. कारण, आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या दिवशी झालेल्या, या मुलाखतीमध्ये समोर होती. क्रीडा मानसशास्त्रात कारकीर्द घडविण्याची महत्त्वकांक्षा बाळगणारी, राष्ट्रीय स्तरावरील युवा जलतरणपटू , प्रशिक्षक सिनोरी खळदकर.



नावापासून वेगळेपण जपत सुरू झालेला, जलतरणपटू होण्यापर्यंतचा प्रवास, भगत सरांकडे घेतलेलं प्रशिक्षण व मिळालेले बाळकडू ह्यातून प्रत्येक पाऊल जपून पुढे टाकत आज कमावलेल्या नावलौकिकापर्यंत अनेक गोष्टींवर ती भरभरून बोलली.


ह्या मुलाखती मध्ये सूत्रधार प्रचेतन पोतदार ह्यांनी प्रेक्षकांना ही नवनवीन प्रश्न विचारावे, ह्यासाठी प्रेरित केले.


अनेक प्रशिक्षकांनी विचारलेल्या अनेक शंकांचे तिने तत्परतेने निरसन केले. मुलाखत सुरू होत असताना त्यामध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी होत असलेल्या अनेक मित्रमैत्रिणींचा तिने कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.


स्त्री म्हणून अनेक समस्या येतात. पण, स्त्री म्हणून त्यावर विजय देखील मिळवता येतो, हे सिनोरी ने स्वतःचे एका स्पर्धेतील सहभागाचे उदाहरण देताना दाखवून दिले. एक खेळाडू म्हणून घडत असताना नेहमी पडणारे प्रश्न आणि त्यावर अगदी स्वानुभवातून आलेली उत्तरे , यामधून, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक नवीन खेळाडूंना मार्गदर्शन तर केलेच, त्याचबरोबर आपले ध्येय आणि स्वतः वर असणारा निस्सीम विश्वास, ध्येयपूर्तीकडे नेतो, हा कानमंत्र पण दिला.


महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना पाण्यातील रिले शर्यतीत अनुभवलेला अंतिम फेरीचा थरार तिने डोळ्यांपुढे उभा केला. मानसशास्त्रात कारकीर्द घडवण्याचे ध्येय असण्याचे सिनोरीने सांगितले. तसेच, क्रीडा मानसशाश्त्रामध्ये पारंगत असलेल्या व्यक्तींची आजच्या क्रीडापटूंना असलेली गरज, टोकियो ऑलिम्पिक चे समर्पक उदाहरण देत, तिने अधोरेखित केली.


अपयशातून उभे राहून यशाकडे कसे जायचे? हे देखील सांगितले. स्पर्धेपूर्वी येणारे दडपण , कसे हाताळावे? यावर देखील प्रकाश टाकला. शास्त्रीय संगीताबद्दल असलेली प्रचंड ओढ आणि भीमपलासी रागातील गायन सादर करून , कार्यक्रमाची उंची आणखी वाढविली. त्याचबरोबर, प्रेक्षकांना देखील एका सशक्त व्यक्तिमत्त्वाशी संपर्क झाल्याचे समाधान वाटले.


हर्षदा पोतदार ह्यांनी मुलाखती साठी तयार केलेले पोस्टर विशेष आवडले, हे तिने आवर्जून नमूद केले.


आयुष्यात इंग्लिश खाडी पोहण्याची महत्वकांक्षा आहे, असे ती रॅपिड फायर मध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली.


त्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा .


प्रेक्षकांना ही मुलाखत पुन्हा एकदा व्हावी, असे वाटत दिवाळी किंवा इतर योग्य वेळी जरूर भेटू ह्या वळणावर मुलाखतीचा समारोप झाला.


१० ऑक्टोबर २०२१ रोजी , AimSolute आणि Positive Thoughts यांच्या सहकार्याने, संपन्न झालेली ही मुलखत, ज्यांना पाहता आली नाही, त्यांनी खालील लिंक वर जरूर क्लिक करा :

भाग १ / २ :

https://www.instagram.com/tv/CU2mrVQoclx/?utm_medium=copy_link


भाग २ / २ :

https://www.instagram.com/tv/CU4l6B2oqqZ/?utm_medium=copy_link


Comments


bottom of page