अगदी स्नेहसंमेलनाला असते तीच लगबग , तशीच धांदल ,तीच उत्सुकता आणि त्याच सगळ्या विद्यार्थिनी ... निमित्त होते साधना शाळेत आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचे...
१९९६-९७ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्धीणींना एक 'हवेहवेसे' निमित्त मिळाले ... परत एकदा शाळेत जाण्याचे...
तब्बल १४७ मैत्रिणी" किलबिलाट आणि चिवचिवाट करत " १३ मे च्या सकाळी ११ वाजता शाळेत गोळ्या झाल्या. त्यांच्याबरोबरच हडपसरपासून दूर असलेल्या , परदेशात असणाऱ्या १८ जणी झूम मीटिंग द्वारे शाळेत पोहोचल्या .... अन शाळेत पाऊल टाकताच मधली २६ वर्षे जणू नाहीशी झाली.
शाळेतले ते दिवस. तो वर्ग, ती घन्टा, ते शिक्षक, त्या शिक्षिका, यामुळे काही काळापुरते का होईना पण जुन्या दिवसांची एक छोटीशी , परंतु अविस्मरणीय सफर अनुभवता आली.
योगायोग पहा ना .. या स्नेहमेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या देखील याच बॅच च्या विद्यार्थिनी. त्याचबरोबर, श्री. किसनराव रत्नपारखीं , पश्चिम विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था , प्राचार्य सुजाता कालेकर , पर्यवेक्षक नितीन सोनावणे , मंदाकिनी शिंदे , छाया पवार , शशिकला साळुंखे , मीनाक्षी वायदंडे, आसावरी वाल्हेकर , ज्योती बुद्रुक, विमल कुदळे, आसावरी मुळे , मंदाकिनी कानडे , छाया कुंभार, विमल ठिगळे , प्रद्युमन उपाध्ये सुनील झिरपे, रघुनाथ जाधव, जाखडे , अशोक वाल्हेकर, तुपे यांची प्रार्थनीय उपस्थित कार्यक्रमास लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करून झाली. आपली सर्वांची मैत्रीण आणि आता साधना विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या शीतल जगदाळे - शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आपल्या विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर, शिक्षिका अनुराधा गेजगे यांनी केले. त्यासाठी , नितीन सोनावणे, मंदाकिली शिंदे, छाया पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. नियोजन कमिटी मध्ये वर्षा कारले प्रतिभा रासकर , कांचन रासकर, संगीता लाड, शुभांगी चव्हाण , हर्षदा पोतदार, शीतल झोडगे, माधुरी भंडलकर, अमृता कालकुंद्री , नेत्र कालकुंद्री, सारिका खजेपवार, ज्योती कदम, या विद्यार्धीणींनी काम केले. स्वाती घाडगे आणि अमित निकम यांनी सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
शाळेत जमल्यावर शिक्षकांचे मार्गदर्शन हवेच ना ! रघुनाथ जाधव , शशिकला साळुंखे , नितीन सोनावणे, मीनाक्षी वायदंडे या शिक्षकांच्या मार्गदर्शनपर शब्दांनी नवीन ऊर्जा दिली. आपल्या हडपसरचे आमदार चेतन तुपे, दिलीप तुपे, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार यांच्या शुभेच्छा कार्यक्रमास लाभल्या.
आता छान छान वाटतंय ना ?
Comentários